अपघात
टाकळीभान मध्ये सलग दुसऱ्या दिवशीही अपघात

टाकळीभान मध्ये सलग दुसऱ्या दिवशीही अपघात
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे अपघाताचे सत्र सुरूच असून सलग दुसऱ्या दिवशीही नेवासे कडून श्रीरामपूर कडे जात असलेल्या पिकप MH 16 AY 3905 चा अचानक ताबा सुटल्याने रोडवरच पलटी झाली. सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झालेली नसून चालक सुखरूप आहे परंतु टाकळीभान परिसरामध्ये अपघाताचे प्रमाण वाढले आहे लोकांमध्येही संभ्रम निर्माण झालेला आहे की या अपघाताचे करावे तरी काय जनावरांसाठी खाद्य म्हणून वापरली जाणारी बार्ली मध्याचे वेस्टेज घेऊन जात असलेली पिकप गाडी अचानक रस्त्यावर पलटी झाली. घटनास्थळी बघ यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी जमा झाली