तंटामूक्त समीतीच्या वतीने वाद मिटला विनाकारण होणारा खर्च मंदिराला दान
तंटामूक्त समीतीच्या वतीने वाद मिटला विनाकारण होणारा खर्च मंदिराला दान
बेलापुर (प्रतिनिधी )-गावातील दोन कुटुंबात गेल्या अनेक वर्षापासून असणारा वाद तंटामूक्त गाव समीतीच्या माध्यमातून मिटविण्यात आला असुन न्यायालयीन लढ्याकरीता होणारा खर्च हा धार्मिक कार्यासाठी समाजसेवक व धार्मिक कार्यात सतत पुढाकार घेणारे सुवालाल लुक्कड यांच्याकडे मान्यवरांच्या उपस्थितीत सूपुर्त करण्यात आला . बेलापुर मळहद येथील राहणारे संजय दत्तात्रय रासकर व सुरेश खंडू भडके या दोन कुटुंबात जागेवरुन वाद होते अनेक वेळा भांडणे हाणामाऱ्या झाल्या वाद पोलीस स्टेशन नंतर न्यायालयात गेला दोघांनीही वकीलामार्फत लढा सुरु ठेवला .थोड्याशा जागेकरीता जागेच्या किमतीपेक्षा जास्त खर्च होवुन वेळही वाया जातो व शेजारी राहुन कायम संबध खराब होतात याची जाण दोन्ही कुटुंबाला झाली त्यांनी तंटामूक्त समीतीकडे अर्ज केला जि प सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे तंटामूक्ती अध्यक्ष पुरुषोत्तम भराटे पत्रकार देविदास देसाई यांनी दोन्ही कुटुंबासमवेत बैठक घेतली व आपापसातले वाद आपसात मिटविण्यावर रासकर व भडके कुटुंबीयात एकमत झाले .वाद मिटले त्यानंतर दोन्ही कुटुंब आनंदात घरी गेले घरी गेल्यानंतर दोघांनीही विचार केला आपला वेळही वाचला शिवाय मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंडही बसला असता त्यामुळे आपले विनाकारण खर्च होणारे पैसे धार्मिक कार्याकरीता दिले पाहीजे तशी संकल्पना त्यांनी उपसरपंच अभिषेक खंडागळे यांना बोलुन दाखवीली त्यानुसार सामाजीक धार्मिक क्षेत्रात अघाडीवर असणारे सुवालाल लुक्कंड यांच्याकडे अकरा हजार रुपये सूपुर्त करण्यात आले या वेळी संजय रासकर आशोक भडके जि प सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे तंटामूक्ती अध्यक्ष पुरुषोत्तम भराटे,प्रविण लुक्कड पोलीस पाटील अशोक प्रधान पत्रकार देविदास देसाई ,सदस्य मुस्ताक शेख शफीक बागवान एकनाथ उर्फ लहानु नागले सचिन अमोलीक शफीक आतार आदि उपस्थित होते