पाणी प्रश्नांवरील राजकारण खपवून घेतले जाणार नाही. आ शंकरराव गडाख
घोडेगाव ग्रामस्थांचा रस्ता रोको व गाव बंद आंदोलनास अभूतपूर्व प्रतिसाद.
पाणी प्रश्नांवरील राजकारण खपवून घेतले जाणार नाही. आ शंकरराव गडाख
घोडेगाव ग्रामस्थांचा रस्ता रोको व गाव बंद आंदोलनास अभूतपूर्व प्रतिसाद.
48 कोटी रुपये किमतीच्या घोडेगाव पाणी योजनेच्या सुरू असलेल्या कामात राजकीय सूडबुद्धीने
दंड करून कामात खोडा घातल्याचा निषेधार्थ
शनी दि 2 सप्टेंबर 2023 रोजी
घोडेगाव ग्रामस्थांनी आ शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली घोडेगाव गावबंद व नगर ,संभाजीनगर महामार्गावर
रास्तारोको आंदोलन करण्यात आले याप्रसंगी भर उन्हात सकाळी 9.30ते दु 12.30 वाजेपर्यंत रास्तारोको आंदोलन
करण्यात आले याप्रसंगी पाच हजार आंदोलक व ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रास्ताविक नानासाहेब रेपाळे यांनी केले.
याप्रसंगी बोलतांना
आ शंकरराव गडाख म्हणाले
मोठ्या प्रयत्नाने विकासकामे मंजुर करून कामे पूर्णत्वास आणण्यासाठी
मी प्रयत्नशील असताना तालुक्यातील
राजकीय विरोधक शासकीय अधिकारी यांना पुढे करून विकासकामे ठप्प करतात व त्यास अधिकारीही साथ देतात ही बाब निषेधार्थ अशीच आहे असे आ गडाख म्हणाले
पाणी योजना काम बंद पडावी यासाठी मुद्दाम त्रास दिला जातो पाणी टॅंकचे काम जलसंपदा विभागाने मोडकळीस आलेल्या इमारतीचा निर्लेखन प्रस्ताव मंजूर न केल्यामुळे ठप्प आहे अधिकारी सदर प्रस्ताव मंजूर करण्याऐवजी टोलवा, टोलवी करण्यात धन्यता मानत आहेत
जिल्ह्यातील ,राज्यातील कोणत्याही पाणी योजनेला अवैध गौण खनिज वाहतूक केल्याचा दंड करण्यात आला नाही परंतु घोडेगावसाठी वेगळा नियम हा संशोधनाचा विषय आहे.
घोडेगाव पाणी योजनेच्या बाबतीत आडकाठी घालून तालुक्यातील इतरही योजना बंद पाडण्याचा डाव तालुक्यातील जनता यशस्वी होऊ देणार नाही.
पाट पाण्याची आवश्यकता लवकर असतांना उशिरा पाणी सोडून शेतकऱ्यांचे पिके जाळण्याचे पाप प्रशासनाने केले
यावर कडी म्हणजे
रोटेशन काळात 20 दिवस मुळा उजवा कालव्या लगत वीज कनेक्शन बंद करून मोटारी बंद करण्याचा तुघलकी फतवा पाटबंधारे विभागाने काढला आहे तो तात्काळ मागे घ्यावा व शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून घ्यावे असे आ गडाख म्हणाले तसेच तसेच तालुक्यातील 85 कोटींच्या कामांना लावण्यात आलेली स्थगिती तात्काळ काढण्यात यावी
पाणी प्रश्नावर तरी राजकारण करू नये असे आ गडाख म्हणाले
मुळा उजवा कालव्यावरील मोटारी पहिले काही दिवस चालू दिल्या जातील व पुढील कालावधीत रोटेशन सर्वांना पाणी मिळावे यासाठी प्रयत्न केले जाईल .पाणी योजनेचे काम तात्काळ सुरू करण्यात येईल असे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिल्या नंतर सदर आंदोलन थांबविण्याची घोषणा आ गडाख यांनी केली सदर आश्वासनांची कार्यवाही लवकरात लवकर झाली नाही तर पुढे व्यापक जनआंदोलन उभारण्यात येईल
असा इशारा आ शंकरराव गडाख यांनी दिला.
याप्रसंगी
अशोकराव गायकवाड,ह भ प नामदेव महाराज कोरडे,सचिन चोरडिया,अशोक येळवंडे, बाळासाहेब सोनवणे,शरद रावसाहेब सोनवणे,सुरेश चौधरी,शरद नारायण सोनवणे,राम सोनवणे,डॉ सुनील वैरागर,राजेंद्र पाटोळे,मा सभापती कारभारी जावळे,चेअरमन नानासाहेब तुवर आदींनी आपले मनोगत व्यक्त करून पाणी योजनेच्या प्रश्नाला व पाट पाण्यावर तालुक्याला होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली.सूत्रसंचालन सुहास गोंटे यांनी केले.
भर उन्हात सुरू आसलेल्या या आंदोलनास महिला भागीनीही मोठया संख्येने हंडे घेऊन उपस्थित होत्या
सदर आंदोलनास पाठिंबा म्हणून
घोडेगाव ग्रामस्थांनी गाव बंद आंदोलन
पुकारले होते यास दोन दुकाने वगळता सर्व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग होता.
याप्रसंगी विश्वासराव गडाख,सुनीलराव गडाख, माजीप्राचे कार्यकारी अभियंता श्याम वारे,उपअभियंता मृणाल धगधगे, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील,तहसिलदार संजय बिरादार,जलसंपदा कार्यकारी अधिकारी सायली कदम,डीवाय एस पी विजय पाटील,सोनई स पो नी माणिक चौधरी,शनीशगिंणापुर पो नी राम कर्पे आदींसह घोडेगाव ग्रामस्थ,तालुक्यातील आलेले विविध संस्थांचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते
चौकट..
*भर उन्हात आ गडाख यांनी आंदोलकासह 4 तास रस्त्यावर मांडले ठाण*.
तीव्र उष्णता असताना देखील भर उन्हात आ शंकरराव गडाख डांबरी रस्त्यावर आंदोलक ग्रामस्थ यांचेसह तब्बल 4 तास बसून होते यामुळे प्रशासनाची पुरती तारांबळ उडाली
सत्ता असो
व नसो आ गडाख सदैव जनतेबरोबर असतात हे आ गडाख यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.
फोटोओळी…
घोडेगाव ता नेवासा येथे पाणी योजना व विविध प्रश्नांवर आंदोलन प्रसंगी आ शंकरराव गडाख व उपस्थित हजारो ग्रामस्थ.