आठ दिवसात महामार्गाचे काम न केल्यास तहसिल कचेरीचत खोदकाम करणार

आठ दिवसात महामार्गाचे काम न केल्यास तहसिल कचेरीचत खोदकाम करणार
शासन व लोकप्रतिनिंधीचे पिंडदान केले
नगर-मनमाड महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे व एकेरी वाहतुकीमुळे शेकडो जणांचे प्राण गेले आहे.तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे.गेल्या ३ वर्षापासून नगर-मनमाड दुरूस्तीसाठी कृती समितीच्यावतीने आंदोलन छेडले तरी लोकप्रतिनि व प्रशसनाससह शासनाला जाग येत नसल्यामुळे शासनाचा व प्रशासनासह लोकप्रतिनिधींचा दशक्रियाविधी तथा पिंडदान करून निषेध व्यक्त करण्यात आला. पिंडदानाचे अनोखे आंदोलन छेडून सरकारसह प्रशासनाचे लक्ष वेधले असून येत्या आठ दिवसात नगर-मनमाड महामार्गाचे काम पूर्ण न केल्यास तहसील कचेरीच्या आवारात खोदकाम करून पुन्हा नाविन्यपूर्ण आंदोलन करु असा इशारा नगर-मनमाड रस्ता कृती समितीच्यावतीने पिंडदानानंतर श्रद्धांजली अर्पण करताना दिला.
नगर-मनमाड महामार्गवरील राहुरी सूतगिरणी जवळ नगर-मनमाड कृती समितीच्यावतीने लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे पिंडदान करून तथा दशक्रियाविधी घालण्यात आला. यावेळी नगर-मनमाड कृती समितीचे सदस्य प्रमोद विधाटे यांनी करून पिंडदान करुन मुंडन केले. यावेळी सुनील काळे गुरू यांनी पौरोहित्य केले. ह.भ.प बाबा महाराज मोरे यांचे प्रवचन झाले.या प्रवचनातून सरकारचा, ठेकेदाराचा व महसूल अधिकाऱ्यांचा निषेध करून आजपर्यंत नगर-मनमाड मार्गावर अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी सरकारचा प्रशासनाचा व लोकप्रतिनिधींचा निषेध करून नगर-मनमाड मार्गावर मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी वसंत कदम म्हणाले की, गेल्या तीन वर्षांपासून नगर-मनमाड कृती समितीच्यावतीने महामार्ग दुरुसतीसाठी आंदोलन छेडले परंतु सरकार व प्रशासनाला जाग येत नाही. त्यामुळे आज पिंडदानाचे आंदोलन हाती घेतले. आठ दिवसात महामार्गवरील खड्डे बुजवून एकेरी वाहतूक बंद करून दुरुस्ती न केल्यास याच नगर-मनमाड मार्गावर मी स्वतः आत्मदहन करणार असल्याचे कदम यांनी सांगितले. याबाबतची प्रशासनला कोणतेही पूर्वसूचना दिली जाणार नाही.
यावेळी देवेंद्र लांबे यांनी शासनाचा निषेध करून आठ दिवसात नगर-मनमाड महामार्ग दुरुस्त न झाल्यास राहुरी तहसील कार्यालयात मी स्वतः कुदळ घेऊन जाऊन खोदकामाचे आंदोलन छेडणार आहे. हे आंदोलन करू नये म्हणून अनेकांनी माझ्यासह वसंत कदम यांच्यावर वेगवेगळ्या मार्गाने दबाव आणण्याचा लोकप्रतिनिधी मार्फत प्रयत्न झाला.परंतु या दबावाला न घाबरता पिंडदानाचे आंदोलन यशस्वी केले आहे.
यावेळी शांती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन यांनी महामार्गावर झालेल्या अपघातास ठेकेदारास जबाबदार धरून त्या ठेकेदाराने जखमी झालेल्या नागरिकास ५० हजार रुपये तर मृत पावलेल्यांना ५ लाख रुपये ठेकेदाराने भरपाई म्हणून द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या आंदोलनास देवेंद्र लांबे, वसंत कदम,शिवचरित्रकार हसन सय्यद, सतीश घुले,प्रकाश भुजाडी ,दीपक त्रिभुवन, रवींद्र मोरे, सुरेश निमसे,जयसिंग घाडगे ,प्रशांत वाबळे, राजेंद्र बोरुडे ,अनिल येवले,दत्ता गागरे ,डॉ.रवी घुगरकर,राजेंद्र लोखंडे,सुधाकर आदिक,
विजय गव्हाणे ,शरद खांदे ,साईनाथ बर्डे,सोमनाथ कीर्तने
आबासाहेब वाळुंज,प्रदीप गरड,अभिजित आहेर,शरद म्हसे वैभव गाडे ,विक्रम गाडे आदिंसह नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते. पसायदानाने या दशक्रिया आंदोलनाची सांगता झाली. आंदोलनस्थळी मोठा पोलिस फाटा उपस्थित असल्यामुळे महामार्गावर छावणीचे स्वरुप आले होते.
–
……. तर तहसील कचेरी खोदकाम करणार
नगर मनमाड महामार्गावर सध्या एकेरी वाहतूक सुरु असल्याने दररोज अपघात घडतात अनेकांचे बळी गेले आहे. मात्र अद्याप प्रशासनाकडून दखल घेतली गेली नाही. कृती समितीने प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. अद्याप हा रस्ता दुरुस्त होऊ शकला नाही. या महामार्गाचे काम सुरू झाले नाही.आठ दिवसात महामार्गाचे काम झाले नाही तर तहसील कार्यालय आवारातच खोदकाम करण्याचे आंदोलन मी स्वतः करणार आहे.
देवेंद्र लांबे
….तर महामार्गावर आत्मदहन करीन.
नगर मनमाड महामार्गावर गेल्या तीन वर्षापासून सातत्याने अपघात होत आहेत. अपघात घडल्यानंतर आम्हाला फोन आल्यानंतर आम्ही तात्काळ घटनास्थळी जाऊन मदत करतो. मात्र हे सर्व अपघात डोळ्याने बघत असताना अक्षरशा हृदय हेलावुन जाते.असे सांगत असताना वसंत कदम भावनाविश झाले.आणि ते रडू लागले.आठ दिवसात महामार्गाचा प्रश्न सोडवला नाही.तर महामार्गावरच आत्मदहन करणार आहे.याची प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी. वसंत कदम
अपघातग्रस्तांना ठेकेदाराने मदत करावी
रस्ता अपघातात मयत झालेल्यांच्या नातेवाईकांना पाच लाख रूपये व अपंगत्व प्राप्त झालेल्यांना पन्नास हजार रुपयांची ठेकेदाराने मदत करावी तर शासनाने अपघातग्रस्तांच्या पाल्याच्या शिक्षणाची जबाबदारी घ्यावी. रस्त्याचे काम देण्यात आलेल्या ठेकेदाराने कोणतीही योग्या ती उपाययोजना केली नाही.तर ठेकेदाराचे कपडे फाडून त्याच्या तोंडाला काळे फासु.
दिपक ञिंभुवन
…त्या लोकप्रतिनिधीचा आंदोलनकर्त्यावर दबाव
नगर मनमाड कृती समितीने शासनाच्या व लोकप्रतिनींधीच्या विरोधात दशक्रीयाविधी तथा पिंडदान करण्याचे आंदोलन हाथी घेतले उत्तर व दक्षिण चे खासदार व आमदार यांनी आंदोलनकर्त्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचे भाषणातुन सांगताच उपस्थित कार्यकर्त्यांनी खासदार आमदारांची नावे घेवून निषेधाच्या घोषणाच्या दिल्या.
जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रतिबंध आदेशावर लोकप्रतिनिधीचे वर्चस्व
उत्सव,सण,इतर परिस्थिती नसताना जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी प्रतिबंधात्मक आदेश काढला आहे. जिल्ह्यात होणाऱ्या विविध आंदोलनांच्या पार्श्वभूमीवरच हा आदेश काढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी महाराष्ट्र पोलिस अधिनियमाचे कलम ३७ (१) अन्वये हा प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार १३ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यात जमावबंदी, मयत व्यक्तीचे छायाचित्र किंवा प्रतिमा चिन्हे फलक प्रदर्शन व आवेशपूर्ण भाषणास मज्जाव केला आहे. शस्त्रे मोटे तलवारी, भाले, दंडुके, बंदुका, सुरे, काठ्या, लाठ्या, अशा वस्तू जवळ बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशा मागे लोक प्रतिनिधींचा हात असुन पिंडदानाचे आंदोलन मोडीत काढण्यासाच जिल्हाधिकारी यांनी जमावबंदीचे आदेश लागू केले असल्याने जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव आणून आदेश काढण्यास लावणाऱ्या लोकप्रतिनिधींचा यावेळी निषेध केला.