३१ वर्षीय महिलेने राहुरी येथील हाॅटेल न्यु भरत या हाॅटेलच्या रूममध्ये ओढणीच्या सहाय्याने
पुणे येथील ३१ वर्षीय महिलेने राहुरी येथील हाॅटेल न्यु भरत या हाॅटेलच्या रूममध्ये ओढणीच्या सहाय्याने
पुणे येथील ३१ वर्षीय महिलेने राहुरी येथील हाॅटेल न्यु भरत या हाॅटेलच्या रूममध्ये ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केलीय. ही घटना आज दिनांक २३ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली आहे. या घटने बाबत हाॅटेल चालकाने पोलिसांना खबर दिली.
अनिता राजू कणसे वय ३१ वर्षे राहणार पुणे शहर, धनकवडी, ओंकार अपार्टमेंट, सावरकर चौक असे नाव व पत्ता मयत महिलेच्या पर्समध्ये मिळालेल्या आधार कार्डवर आहे. या महिलेने दिनांक २२ फेब्रुवारी रोजी राहुरी येथे येऊन राहुरी खुर्द ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या हाॅटेल न्यु भरत या ठिकाणी दुपारी बारा वाजे दरम्यान एक खोली भाडोत्री घेतली होती. आज सकाळी अकरा वाजे दरम्यान साफ सफाई करणाऱ्या एका महिलेने तिच्या खोलीचा दरवाजा वाजवला. परंतू आतून काही प्रतिक्रिया आली नाही. तिने हाॅटेल चालक विकी वैष्णवी यांना सांगितले. त्यांनी दरवाजाच्या फटीतून आत डोकावले तेव्हा ती महिला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. विकी वैष्णवी यांनी तातडीने राहुरी पोलिसांना घटनेची माहिती दिली. राहुरी पोलिस ठाण्यातील पोलिस उप निरीक्षक निरज बोकील, हवालदार एकनाथ आव्हाड, पोलिस शिपाई भाऊसाहेब शिरसाठ यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पोलिसां समक्ष खोलीचा दरवाजा तोडण्यात आला. त्यावेळी सदर महिला ही छताला असलेल्या फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत होती.
तिला ताबडतोब खाली उतरून राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला उपचारापूर्वीच मयत घोषित केले. यावेळी राष्ट्रवादीचे युवक जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र बोरकर, रफिकभाई शेख, निसारभाई शेख आदि उपस्थित होते. पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर महिलेच्या नातेवाईकांचा शोध सुरू असून आत्महत्याचे निश्चित कारण समजले नाही. त्या महिलेने कोणत्या कारणाने आत्महत्या केली याचा तपास पोलिस करत आहेत. या घटने बाबत दुपारी उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.