सोनई पोलीसांकडुन गणेशवाडी येथील युवकास बेदम मारहाण युवक उपचारासाठी प्रवरा येथील रुग्णालयात दाखल
सोनई पोलीसांकडुन गणेशवाडी येथील युवकास बेदम मारहाण युवक उपचारासाठी प्रवरा येथील रुग्णालयात दाखल
नेवासा तालुक्यातील गणेशवाडी येथील युवकास पोलीस ठाण्यात बोलाऊनय अमानुषपणे मारहाण केल्याप्रकरणी सोनई पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक अहमदनगर यांना निवेदन देण्यात आले आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की गणेशवाडी येथील रहिवाशी राजेंद्र रायभान मोहिते यांस समज देण्याच्या नावाखाली सोनई पोलीस ठाण्यात बोलावून बेकायदेशीररित्या न्यायालयाचे समन्स, आदेश वाॅरट नसताना सोनई पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी या युवकास पोलीस ठाण्यातच बेदम मारहाण करण्यात आली असुन, सध्या हा युवक लोणी प्रवरायेथील रुग्णालयात आय सी यु विभागात उपचार घेत असुन त्याची परिस्थिती गंभीर असल्याचे समजते या बाबतचे निवेदन पोलीस अधीक्षकांना देण्यात आले असुन त्याच्य प्रति राज्याचे गृहमंत्री, नाशिक पोलीस महानिरिक्षक नाशिक परिक्षेत्र यांना पाठविण्यात आल्या असुन संबंधितांवर कारवाई न झाल्यास उपोषण करून मोर्चा काढण्यात येणार आहेत सोनई परिसरातील अवैध्य धंदे, चोऱ्या, वाढती वाळु तस्करी, अवैध सावकारी अशा गभीर गुन्ह्याची नोंद याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ केली जात आहे अशा गंभीर तक्रारी करण्यात आल्या असुन याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोर्टाचा आदेश नसताना सदर युवकास चार चार पोलीसांनी मिळुन बेदम पणे अमानुष मारहाण केली त्यांच्या कडुन असा कोणता गंभीर स्वरुपाच्या गुन्हा घडला होता असा सवाल उपस्थित केला जात आहे .
[ समज देण्याच्या नावाखाली अपरात्री सोनई पोलीसांनी घरी येऊन राजेंद्र मोहिते यांच्या परिवारास धमकावले राजेंद्र मोहिते यास पोलिस स्टेशनला नेऊन अमानुष पणे मारहाण केली व भगवा ध्वज मोबाईलवर फोटो ठेऊ नको अशी दमदाटी देखील पोलीस अधिकारी सचिन बागुल व सहकार्यानी केली त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही उपोषण करणार आहे. गणेशवाडी गावात एकही मुस्लीम समाजाचे घर नाही तर वाद होण्याचा प्रश्नच येत नाही.] . अजय मोहितेगणेशवाडी पीडित व्यक्तीचा भाऊ
आम्ही मोहीतेला कुठल्याही प्रकारे मारहाण केलेली नाही. वाद नको या कारणासाठी त्याला आम्ही पोलीस स्टेशनला आणले होते. ]
सचिन बागुल सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनई.