ब्रेकिंग

टाकळीभान येथे घरकुल बाबत विशेष ग्रामसभा…

टाकळीभान येथे घरकुल बाबत विशेष ग्रामसभा…

 

टाकळीभान प्रतिनिधी : टाकळीभान येथे दि. 24 रोजी सांस्कृतिक भवन या ठिकाणी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी घरकुला बाबत ब व ड यादीचे वाचन करण्यात आले. ग्रामविकास अधिकारी आर एफ जाधव यांनी घरकुल यादीचे वाचन केले. यावेळी सरपंच अर्चनाताई रणनवरे, अशोक चे माजी चेअरमन ज्ञानदेव साळुंके, माजी संचालक दत्तात्रय नाईक, संचालक आप्पा यशवंत रणनवरे, माजी उपसरपंच पाराजी पटारे,ग्राम. सदस्य मयूर पटारे, सुनील बोडखे, भाऊसाहेब पटारे, प्रा. जयकर मगर, मुकुंद हापसे, भैय्या पठाण, पाटीलबा पटारे, गोटीराम दाभाडे, रोहिदास बिरसणे, आदींसह घरकुल लाभार्थी उपस्थित होते. यादीमध्ये पात्र 403 पैकी 113 लाभार्थी घरकुल योजनेचा लाभ घेत आहे. यादीमध्ये 602 पैकी 242 पात्र लाभार्थी आहेत. यावेळी माजी सरपंच मंजाबापू थोरात म्हणाले की आजची घरकुल प्रश्नाबाबत महत्त्वाची ग्रामसभा असून या विशेष ग्रामसभेला 17 ग्रामपंचायत सदस्यांपैकी खूप कमी सदस्य उपस्थित आहेत, या उदासीनते बद्दल नाराजी व्यक्त केली. गावातील लोकांनी आपल्यावर विश्वास ठेवून आपल्या ताब्यात सत्ता दिली आहे. गावाचा विकास करणे ही आपली जबाबदारी आहे व तो गट गट सोडून राजकारण विरहित करणे अपेक्षित आहे, गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन एक दिलाने काम करावे असे ते यावेळी म्हणाले. यावेळी ग्राम. सदस्य मयूर पटारे म्हणाले की कुणीही गरजवंत लाभार्थी घरकुल पासून वंचित राहणार नाही याची काळजी टाकळीभान ग्रामपंचायत घेणार असून कोणावर ही अन्याय होणार नाही याची ग्वाही त्यांनी दिली. याप्रसंगी भास्करराव कोकणे, मल्हारी रणनवरे, नानासाहेब रणनवरे, भैया पठाण, कोकणे यांनी आपले प्रश्न ग्रामसभेत मांडले.

           घरकुलाचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोचला पाहिजे अन्यथा जनता माफ करणार नाही -युवक नेते भाऊसाहेब नानासाहेब पवार

 

Rate this post
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे