ब्रेकिंग

अमित मुथांच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाकडेही पालिकेचे दुर्लक्ष… दिवाळी सणाला पाणी न सोडल्याने नागरिकांमध्ये संताप.

अमित मुथांच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाकडेही पालिकेचे दुर्लक्ष… दिवाळी सणाला पाणी न सोडल्याने नागरिकांमध्ये संताप.

 

हिंदूंच्या सणाच्या दिवशीच नगरपालिकेने जाणीवपूर्वक पाणी न सोडल्याने अमित मुथा यांनी दिले निवेदन 

 

श्रीरामपूर(प्रतिनिधी):-संपूर्ण भारतीयांचा राष्ट्रीय सण व हिंदूंचा सर्वात महत्वाचा दिपोत्सव म्हणजे दिपावली या हिंदूंच्या सणाच्या दिवशीच नगरपालिकेने जाणीवपूर्वक पाणी न सोडल्याने श्रीरामपूर पालिकेतील स्वाभिमानी हिंदूंच्या सणाच्या दिवशीच नगरपालिकेने जाणीवपूर्वक पाणी न सोडल्यानेत्ताधाधाऱ्यांना शहरातील प्रत्येक गल्लीबोळीत सामूहिकरीत्या शिव्यांची लाखोली वाहिली जात आहे.पालिकेतील कारभार सरळ सुतासारखा चालावा म्हणून सतत कार्यतत्पर असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अमित मुथा यांनी पालिकेच्या या ढिसुळ कारभाराविरोधात आता आपल्या मिशा पिळल्या आहेत.*

याबाबत आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करतांना अमित मुथा म्हणाले की,भंडारदरा धरणातील निम्म्या पाण्यावर श्रीरामपूर तालुक्याचा पूर्वापार हक्क आहे आणि असे असतांना श्रीरामपूर पालिकेच्या साठवण तलावात पाणी साठा मुबलक असतांना स्वाभिमानी सत्ताधाऱ्यांनी जाणीवपूर्वक हिंदूंच्या सणांना टार्गेट करत पाणी सोडण्याचे न नियोजन केले आहे ते हिंदूंच्या भावनेशी खेळल्या सारखे आहे यासाठी हिंदूंनी आक्रमक पावित्रा घेण्याची वेळ आल्याचेही अमित मुथा यांनी आपल्या प्रतिक्रियेत तगमग व्यक्त केली आहे. याबाबत व्यक्त होतांना मुथा म्हणाले की, ज्यांना श्रीरामपूर शहरातील हिंदूंविषयी कळवळा आहे त्यांना शांत करण्याचा व हिंदूद्वेषी जिहादी मतांच्या गठ्ठा मतांसाठी लाचार होण्याच्या कामातच लोकप्रतिनिधी व पालिका सत्ताधारी व्यस्त असल्याने साठवण तलावात मुबलक पाणी असतानाही व आपण स्वतः जिल्हाधिकारी यांना समक्ष भेटून त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना तसे आदेश देवूनही जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला मुख्याधिकारी यांनी जुमानले नाही ही बाब खूप संतापजनक असल्याची तीव्र प्रतिक्रिया मुथा यांनी व्यक्त केली आहे. जिल्हाधिकारी यांचे आदेश न पाळता सगळा प्रकार महावितरणवर ढकलण्याचा धुर्तपणा पालिका करत असल्याचा स्पष्ट आरोप मुथा यांनी केला आहे.सोमवार गुरुवार पाणी नियोजन करताना फक्त वसुबारसला पाणी धनत्रयोदशी, दिवाळी,पाडवा,भाऊबीज या दिवशी पाणी पुरवठा झाला नाही हिंदू सण संपवण्याचा काँग्रेसचा कुटील डाव असल्याचा आरोप अमित मुथा यांनी यावेळी केला.

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे