देव देश आणि धर्म, हिंदूंच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या सागर बेग यांना विजयी करा – संत महेशजी व्यास
तरुण पिढीने व्यसनापासून दूर राहावे. सागर बेग
देव देश आणि धर्म, हिंदूंच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या सागर बेग यांना विजयी करा – संत महेशजी व्यास
तरुण पिढीने व्यसनापासून दूर राहावे. सागर बेग
श्रीरामपूर(प्रतिनिधी):- देव देश आणि धर्म यासाठी सदैव कटिबद्ध असणाऱ्या आणि हिंदूंच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या सागर बेग यांना विजयी करण्याचे आवाहन कथा प्रवक्ता संस्थापक संत श्री परिवार गोविंद अनुशंधान गौशाळा महेशजी व्यास यांनी टाकळीभान येथे राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष तथा अपक्ष उमेदवार सागर बेग यांच्या प्रचारार्थ टाकळीभान येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेप्रसंगी उपस्थित प्रचंड जनसमुदायासमोर केले.
यावेळी बोलताना महेशजी व्यास पुढे म्हणाले की देव,देश आणि धर्म गोमाता रक्षण, माता भगिनींचे रक्षण यासाठी सदैव तत्पर असलेल्या सागर बेग यांना प्रचंड मतांनी विजयी करा हिंदूंची एकजूट दाखवा असे आवाहन महेशजी व्यास यांनी यावेळी उपस्थित जनसमुदायाला संबोधतांना केले.
व्यास महाराज पुढे म्हणाले की,हिंदू धर्माचे रक्षण करायची ताकद फक्त सागर बेग यांच्यात आहे जो धर्म रक्षणार्थ मैदनात उरतला आहे त्याच्या मागे जात पात विसरून उभे राहण्याचे प्रत्येक हिंदूंचे आद्य कर्तव्य आहे.हिंदू आज जागरूक झाला नाहीतर आपल्याला कथा किर्तन देखील करता येणार नाही अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे हिंदू धर्मात सहिष्णू हा शब्द कुठून आला याबाबत कोणाला काहीही सांगता येणार नाही परंतु गेल्या 40-50 वर्षातच हा शब्द जास्त प्रचलित करण्यात आला एका गालावर मारल्यास दुसरा गाल पुढे करा अशा प्रकारची सहिष्णुत्व आम्हाला नकोय जे प्रभू श्रीरामांना मान्य नव्हत परशुराम श्रीकृष्ण पंढरीनाथ भगवती भवानी माता यांना देखील मान्य नाही.सागर बेग यांच्या पाठीशी उभे राहण्याचा मी घेतलेल्या निर्णयावर माझ्या अनेक संबंधितांनी मला विरोधात्मक फोन केले पण धर्म रक्षणाची धमक फक्त आणि फक्त सागर बेग यांच्यात असल्याने मी घेतलेला धर्माप्रती निर्णय हा सदैव्य कायम राहणार आहे.
यावेळी राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष तथा अपक्ष उमेदवार सागर बेग यांनी केलेल्या भाषणात हिंदू धर्मासाठी मतदान करण्याचे आवाहन केले.काँग्रेसच्या प्रचारार्थ मुस्लिम मोहल्ल्यात झालेल्या प्रचार सभेत एक जिहादी हिंदुंची टिंगल उडवतो आणि उमेदवार टाळ्या वाजवून त्याचे समर्थन करतो ही परिस्थिती आपल्याला बदलायची आहे.आमच्या हिंदू मुली,महिला यांना मान सन्मान इज्जत आहे कोणी भरसभेत महिलांविषयी अपशब्द वापरत असेल तर हिंदू काही आता शंड राहिलेला नाही याचे बोलणाऱ्याने लक्षात ठेवावे असा इशारा बेग यांनी जिहाद्यांना दिला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विष्णू पटारे होते तर हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी अपक्ष उमेदवार सागर बेग यांचे भव्य स्वागत टाकळीभान ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले यावेळी बोलताना सागर बेग पुढे म्हणाले की, तरुणांनी व्यसनाधीन होऊ नका व्यसनाच्या आहारी जाऊ नका घरातील कर्ता पुरुष व्यसनाधीन असेल तर कुटुंबाचा नाश होतो त्यामुळे व्यसन करू नका तसेच मी राजकारणासाठी नाही तर धर्माच्या रक्षणासाठी राजकारणात आलो आहे आपला धर्म टिकवायचा असेल तर हिंदुत्ववादी मतदारांनी मला मतदान करा असे जाहीर आवाहन यावेळी राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष तथा अपक्ष उमेदवार सागर बेग यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी टाकळीभान पंचक्रोशीतील असंख्य राष्ट्रीय श्रीराम संघाचे कार्यकर्ते प्रयत्नशील होते तर मतदान मोठ्या प्रमाणात घडवून आणण्यासाठी युवक वर्ग रात्रंदिवस कष्ट घेत आहे.