ब्रेकिंगमहाराष्ट्र

दारूड्या मित्रमंडळीमुळे हळदीच्या दिवशीच विवाह मोडला

बोहल्यावर चढण्याआधीच वराला दाखवला घरचा रस्ता

दारूड्या मित्रमंडळीमुळे हळदीच्या दिवशीच विवाह मोडला

 

बोहल्यावर चढण्याआधीच वराला दाखवला घरचा रस्ता

 

टाकळीभान- प्रतिनिधी- : लग्नाच्या मुलीची पसंती होवून अखेर ठरल्याप्रमाणे वरासह हौशेने दाखल झाले. हळदी समारंभ पुर्वसंध्येला हळदीच्या दिवशी वरपक्षाकडील नवरदेवाच्या मित्रमंडळींनी मदीरा प्राशन करून हळदी समारंभात गदारोळ केला. त्यांनी केलेल्या या रंगीत पार्टीचे परिणाम प्रत्यक्षात लग्न मोडण्यात झाले. वधूपक्षाकडून अशा व्यसनी असलेल्या लोकांना मुलगी न देण्याचा धाडसी निर्णय यावेळी घेतल्याने बोहल्यावर चढण्याआधीच घरचा रस्ता वराला धरावा लागल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे नूकतीच घडली.

           याबाबतची माहीती अशी की, टाकळीभान येथील मुलीचा विवाह अहिल्यानगर येथील मुलाशी ठरला होता. रीतीभाती प्रमाणे लग्न समारंभाचे सर्वच केली. आपण एखाद्या हॉटेलात बसून रंगीतसोपस्कार यापूर्वीच पार पडले. मुला- लग्नाचा शुभमूर्हतही ठरला. वरपक्षाचे जवळील नातेवाईक व मित्रमंडळी मोठ्या हळदीसाठी टाकळीभान येथे होवून दुसर्या दिवशी नवरदेव बोहल्यावर उभा राहणारच होता. मात्र त्या अगोदरच वरपक्षातील नातेवाईक व मित्रमंडळीने आपले गुण दाखवले. लग्नाच्या पुर्व संध्येलाच हळदीच्या दिवशी कुठलाही मुलाहीजा न बाळगता नवरदेवाच्या मित्रांनी यथेच्छ अशी दारू प्राशान बघत मुलगी प्रश्न उभा पार्टी साजरी करत असल्याचा अर्विभाव त्यांना आला असल्याचे समजते. दारूच्या नशेत हळदीच्या ठिकाणीच वरपक्षाकडील वराच्या मित्रांकडून धिंगाणा सुरू झाला. हा सर्व तमाशा हताश होवून वधूपक्षाकडील लोक होते. काय करावे समजत नव्हते. अशा व्यसनाधिन मित्रपरिवार असलेल्या मुलाला कशी द्यावी. असा यक्ष वधूपक्षाकडील लोकांसमोर राहीला. अखेर मुलगी न दिलेलीच बरी असा धाडसी निर्णय यावेळी वधूपक्षाकडील मंडळीनी घेवून वराला बोहल्यावर चढण्याअगोदरच घरचा रस्ता दाखवला.

 

आजमितीला समाजात व्यसनाधिनता वाढत चालली असून तरूण वर्ग या व्यसनाचे शिकार होत आहे. कुठे काय करावे याची जराशीही पर्वा न करता वाहवत चाललेला तरूण या व्यसनाधिनतेने बरबाद होत आहे. अशा या व्यसनी मित्रपरिवार असलेल्या वराची निरव्यसनी असल्याची खात्री कोण देईल ? संसाराची वेल फुलण्याआधीच ती कोमेजून जात असेल तर ते न झालेलेच बरे ! व येथेही तसेच झाले. अखेर वधूपक्षाकडील हुशारीने हा विवाह सोहळा हळदीच्या दिवशीच मोडला. या निर्णयाने वधूपक्षाकडील लोकांचे कौतूक होत आहे.

4.2/5 - (5 votes)
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे