ब्रेकिंगमहाराष्ट्र

*राहुरीच्या शिवसैनिकांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेत वाचला विदयापीठ्याच्या तक्रारींचा पाढा*

*राहुरीच्या शिवसैनिकांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेत वाचला विदयापीठ्याच्या तक्रारींचा पाढा*

 

 

 

शुक्रवार दि.२६ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित शिर्डी येथे समृद्धी महामार्गाच्या टप्पा दोनचे उदघाटन संपन्न झाले.

या कार्यक्रमा नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राहुरी तालुक्यातील शिवसैनिकांची भेट घडवून देण्यासाठी शिर्डी लोकसभेचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्याकडे तालुकाध्यक्ष देवेंद्र लांबे यांनी विनंती केली,खा.लोखंडे यांनी तात्काळ नाम.एकनाथ शिंदे यांची भेट घडवून आणली. राहुरी तालुका शिष्ट मंडळात राहुरी ता.प्र.देवेंद्र लांबे,किशोर मोरे,प्रशांत खाळेकर,अशोक तनपुरे,महेंद्र उगले, रोहित नालकर हे उपस्थित होते.

यावेळी राहुरी तालुकाध्यक्ष देवेंद्र लांबे यांनी राहुरी येथिल महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथिल कुलगुरू प्रशांत पाटील यांनी चालवलेल्या मनमानी कारभाराचे दस्तावेज ना.शिंदे यांना दिले आहेत.तसेच राहुरी येथिल छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा,मराठा भवन, ग्रामीण रुग्णालय,बस स्थानक,तसेच राहुरी ते शनी शिंगणापूर या रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे मागील काही दिवसांपूर्वी अनेक अपघात झाल्याचे सांगितले व उंबरे येथिल दोन युवकांचा अपघातात मृत्यू झाल्याचे सांगितले.टाकळीमिया येथिल जलस्वराज टप्पा दोनची (रु.९.५७ लाख) पूर्ण पणे फेल गेल्याचे निदर्शनास आणून देत त्या आशयाचे पत्र दिले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्व गोष्टी गंभीर पूर्वक जाणून घेतल्या. खा.सदाशिव लोखंडे यांनी राहुरी तालुक्यातील शिवसैनिकांच्या शिष्टमंडळाला सोबत घेत मुंबई येथे राज्यपाल यांची भेट घडवत कुलगुरू प्रशांत पाटील यांच्या गैरकारभाराबाबत दस्तावेज देणार आहेत.

राहुरी तालुक्यातील शेकडो शिवसैनिक जिल्हा प्रमुख राजेंद्र देवकर,उपजिल्हा प्रमुख जयवंत पवार यांच्या आदेशाने उपस्थित होते.या कार्यक्रमास राजेंद्र लबडे,ज्ञानेश्वर सप्रे,महेंद्र शेळके,सतीष जाधव,वांबोरी शहर प्रमुख अंकुश पवार,युवसेनेचा ता.प्र.औदुंबर करपे,महिला आ.प्र.वनिताताई जाधव ,अनिल आढाव आदी शिवसैनिक उपस्थित होते.

 

 

 

महात्मा फुले कृषी विद्यापीठातील गैरकारभाराबाबत राहुरी तालुक्यातील शिवसैनिकांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केल्यामुळे कुलगुरू प्रशांत पाटील यांच्या अडचणीत वाढण्याचे चिन्ह दिसत आहेत.कृषी विद्यापिठ प्रशासनाने शिवसैनिकांचा रोष चांगलाच महागात पडणार असे एकूण चित्र निर्माण झाले आहे.

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे