गोमाताच्या किंकाळीचा आवाज बंद करा नाही तर, राज्यकर्त्यांना सुख नाही- गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज

गोमाताच्या किंकाळीचा आवाज बंद करा नाही तर, राज्यकर्त्यांना सुख नाही- गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज
गायीच्या किंकाळीचा आवाज बंद कर नाही, तर राज्यकर्त्यांना सुख नाही, असे आव्हान टाकळीभान येथे श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळयाची गुरुवर्य श्री भास्करगिरीजी बाबांच्या काल्याच्या किर्तन रुपीस सेवेत राज्यकर्त्यांना आवाहन केले,
टाकळीभान येथे श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळयाची स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या सुश्राव्य वाणीतून झालेल्या श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळयाची शनिवारी दि.२७ मे रोजी गुरुवर्य श्री भास्करगिरीजी बाबांच्या काल्याच्या किर्तनाने भक्तिमय व मंगलमय वातावरणात सांगता करण्यात आली. धार्मिक कार्यक्रम व सत्संगाच्या माध्यमातून जीवनात सात्विकता निर्माण करण्याचा प्रयत्न करा,शक्ती व युक्ती मिळून भक्ती निर्माण करण्याचा प्रयत्न करा असे आवाहन गुरुवर्य महंत भास्करगिरीजी महाराज यांनी यावेळी बोलतांना केले.
यावेळी बोलतांना गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज पुढे म्हणाले की येथे झालेल्या श्रीमद भागवत कथेने धर्माची शोभा वाढवली आहे,ईश्वरनिष्ठ संत समाजाला सतत भेटले पाहिजे म्हणून अनेक संत महंतांनी येथे हजेरी लावली त्यामुळे येथे ईश चैतन्य निर्माण झाले त्यामुळे प्रत्येकाच्या हदयात देवाचे व्यापकत्व निर्माण झाले असल्याचे सांगत त्यांनी युवा मंडळासह ग्रामस्थ भक्त परिवार व आयोजकांचे ही कौतुक यावेळी बोलतांना केले.
स्वातंत्र्याचा अधिकार आपल्याला मिळाला असला तरी याचा स्वैराचार होता कामा नये असे सांगतांना त्यांनी आपल्याला हे पूर्वजांनी बलिदानातून व त्यागातून दिले आहे,हक्कांबरोबर संस्कार घेणे हीच आपली संस्कृती आहे,दुसऱ्याकरीता केलेले कार्य ईश्वर कधीही कमी पडू देत नाही,सत्संगाने मनुष्य जीवन सफल होते,जीवनात आनंद उपभोगायचा असेल तर दैवतांचा व दिनदुबळयाचा स्वाभिमान वाढवा असे आवाहन त्यांनी यावेळी बोलतांना केले.
यावेळी झालेल्या काल्याच्या कीर्तन प्रसंगी गुरुवर्य भास्करगिरीजी बाबांनी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या बाललीलांचे वर्णन केले जसे भगवंताने गाईचे रक्षण केले त्याच प्रमाणे आपण ही गोरक्षण करा हे राष्ट्र रक्षणासारखेच असल्याचे
सांगत त्यांनी सद्या गोमतेची ऐकू येत असलेली किंकाळी बंद करा,राष्ट्राच्या हिताला व राष्ट्र संरक्षणाला हितकारक असलेली अध्यात्मिक ऊर्जा मनामनात निर्माण करा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी झालेल्या काल्याच्या कीर्तन प्रसंगी गुरुवर्य भास्करगिरीजी बाबांच्या हस्ते काल्याची दहीहंडी फोडण्यात आली. या सोहळयाच्या सांगता प्रसंगी श्री क्षेत्र देवगड दत्त मंदिर संस्थानचे उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज,बाल योगी महंत विश्वनाथगिरीजी महाराज,हनुमान गडाचे सेवेकरी महंत संतोष महाराज चौधरी,भानुदास महाराज नवले,संजय महाराज सरोदे,सरला बेटाचे सेवेकरी दत्तात्रय महाराज बहीरट यांच्यासह संत महंत विविध क्षेत्रातील मान्यवर गायनाचार्य, वादक,महाराज मंडळी यांच्या हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते.उपस्थित हजारो भाविकांना आमटी भाकरीच्या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.