आरो फिल्टर दूषित पाण्यावर टाकळीभान मध्ये
आरो फिल्टर दूषित पाण्यावर टाकळीभान मध्ये राजकारण
टाकळीभान येते आरो फिल्टर प्लांट मधून दूषित पाण्यावर सोशल मीडियावर राजकारण थांबा जनतेच्या आरोग्याचा प्रश्न आहे –सुप्रियाताई धुमाल,
टाकळीभान येते काल गावातील काही नागरिक फिल्टर पाणी घेण्यासाठी गेले असता त्यात त्यांना जंतू आढळून आले. त्यांनी त्वरित ग्रामपंचायत प्रशासनाशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर सरपंच, सदस्य व ग्रामविकास अधिकारी यांनी भेट देऊन तपासणी केली असता टाकीत जंतू आढळून आल्याचे दिसले. टाकळीभानचे आरोग्य अधिकारी यांना बोलवून घेऊन पाण्याचा नमुना तपासणी साठी पाठविण्यात आला आहे. १ वर्ष दोष निवारण कालावधी ठेकेदार यांच्याकडे असून त्यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली आहे आणि त्वरित दुरुस्ती करण्यास सांगितले आहे.
ग्रामपंचायत प्रशासनाने जोपर्यंत फिल्टर प्लांट दुरूस्त होत नाही, तोपर्यंत पाणी बंद ठेवण्याचे व्हाट्सअप च्या माध्यमातून, सोशल मीडियावर मेसेज पाठवण्यात आला होता, त्यावर काही स्वयंघोषित पुढाऱ्यांनी जनतेच्या, आरोग्याच्या प्रश्नाच्या विषय बाजूला ठेवून ,या विषयाला राजकीय वळण दिले,
यावरून सुज्ञ नागरिकांनी जनतेच्या आरोग्याच्या प्रश्नावर राजकारण थांबवा ,जनतेच्या आरोग्याशी खेळू नका ,असे भाजपचे जिल्हा स्वास्थ सदस्य सुप्रियाताई धुमाळ ,यांनी असे आवाहन केले