पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान राहुरी यांच्यावतीने 8 मे रोजी जयंतीनिमित्त पूर्वनियोजन बैठकीचे आयोजन

पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान राहुरी यांच्यावतीने 8 मे रोजी जयंतीनिमित्त पूर्वनियोजन बैठकीचे आयोजन
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठान, राहुरी तालुका यांच्यावतीने 31 मे रोजी असलेल्या अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव सोहळा दरवर्षीप्रमाणे 2022 मध्येही राहुरी शहरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी कार्यक्रमाचे नियोजन व रूपरेषा ठरविण्यासाठी पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठान राहुरी यांच्यावतीने सर्व प्रतिष्ठानचे सदस्य व धनगर समाज बांधव धनगर समाज प्रतिष्ठित पदाधिकारी यांना महत्त्वपूर्ण बैठकीस उपस्थितीत राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
दिनांक मे 2022 रविवारी रोजी सकाळी ठीक 10:00 वाजता ठिकाण-बिरोबा मंदिर गाडगे आश्रम शाळेच्या शेजारी नियोजन बैठक आयोजित करण्यात आली आहे तरी सर्व समाज बांधवांनी या महत्त्वपूर्ण बैठकीसाठी आपला सहभाग नोंदविण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठान राहुरी तालुका यांच्या वतीने करण्यात आले आहे.