राजकिय
बिग बागायतदार विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी दिपक डुकरे यांची तर उपाध्यक्षपदी राजेंद्र कांबळे यांची बिनविरोध निवड.

टाकळीभान, बिग बागायतदार विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी दिपक डुकरे यांची तर उपाध्यक्षपदी राजेंद्र कांबळे यांची बिनविरोध निवड.
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील टाकळीभान बिग बागायतदार विविध.कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी दिपक नाना डुकरे यांची तर उपाध्यक्षपदी राजेंद्र मोहन कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
संस्थेची२०२१—२२ ते २०२६— २७ च्या संचालक मंडळाची निवडणुक नुकतीच बिनविरोध पार पडली असून आज दिनांक २९ एप्रिल रोजी झालेल्या पदाधिकारी निवडीत अध्यक्षपदी दिपक डुकरे यांची तर उपाध्यक्षपदी राजेंद्र कांबळे यांची निवड करण्यात आली. निवडणुक निर्णयअधिकारी म्हणून सहाय्यक सहकार अधिकारी संदीप कोठुळे यांनी काम पाहिले त्यांना सचिव रामनाथ ब्राम्हणे व विजय देवळालकर यांनी सहकार्य केले.
माजी सभापती नानासाहेब पवार संसस्थापक यांचे मार्गदर्शनाखाली संस्थेचे कामकाज सुरू असून संस्थेचा दरवर्षी शंभर टक्के कर्जाचा वसुल होवून संस्था पारीतोषकास पात्र ठरलेली आहे.
नुकत्याच झालेल्या संस्थेच्या संचालक मंडळाची पंचवार्षीक निवडणुक पार पडली असून आज पदाधिकारी निवडीची निवडणुक सहकार विभागाचे अधिकारी संदिप कोठुळे यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी अध्यक्ष पदासाठी दिपक डुकरे व उपाध्यक्ष पदासाठी राजेंद्र कांबळे असे दोनच अर्ज आल्याने अधिकारी संदिप कोठुळे यांनी अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या निवडी बिनविरोध जाहीर केल्या.
निवडीनंतर अध्यक्ष दिपक डुकरे, उपाध्यक्ष राजेंद्र कांबळे व अधिकारी संदिप कोठुळे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी सभापती नानासाहेब पवार,
शिवाजीराव धुमाळ, रमेशदादा धुमाळ, दिपक धुमाळ,
महिवीर काले, भगवान कांबळे, राहूल पटारे, शंकर शिंदे आदी उपस्थित होते.
टाकळीभान— येथील टाकळीभान बिग बागायतदार
विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी दिपक डुकरे यांची तर उपाध्यक्षपदी राजेंद्र कांबळे यांची बिन
विरोध निवड झाली असून निवडीबद्दल त्यांचा सत्कार
करण्यात आला. यावेळी नानासाहेब पवार, शिवाजीराव धुमाळ, रमेशदादा धुमाळ, राहूल पटारे व
संचालक उपस्थित होते.