राहुरी तालुक्यातील तरुण ते पुणे लोकसभा उमेदवार पर्यंत प्रवास. चिन्ह तुतारी

राहुरी तालुक्यातील तरुण ते पुणे लोकसभा उमेदवार पर्यंत प्रवास. चिन्ह तुतारी
राहुरी तालुक्यातील तिळापुर येथील ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबांमधील जन्माला आलेला मुलगा कुठलाही राजकीय वारसा नसतानाही शिक्षण पूर्ण करण्यासाठी तसेच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी पुणे येथे राहत असतानाच पुणे तिथे काय उणे या म्हणीप्रमाणे चक्क रयत स्वाभिमानी संघटना पुरस्कृत होत पोहोचला खासदारकीच्या उमेदवारीपर्यंत.
सर्व सामान्यांच्या अडीअडचणी काय असतात त्या कशा रीतीने मांडल्या जातात याचा अभ्यास तर आहेच परंतु प्रगतीच्या मार्गाने चालू असलेल्या घडामोडींचा आढावा घेऊन अजून पुढे काय विकास करता येईल तसेच भ्रष्टाचार कसा कमी करता येईल याचा परिपूर्ण अभ्यास केलेले संदीप उर्फ आबा चोरमले यांनी पुण्यामध्ये जाऊन सर्वांची मने जिंकत चक्क लोकसभा उमेदवारी मिळवण्यात यश मिळवले.
उमेदवारी मिळाली असताच हजारो तरुणांची मने जिंकत प्रचंड हिमतीच्या जोरावरती निवडणूक रिंगणात उतरताच विरोधकांना धक्का देत निवडणूक जिंकण्यासाठी हजारो सवंगडी संगतीला घेऊन सर्वसामान्य माणूस ते धूर्त राजकारण्यांच्या मनामध्ये नाव बिंबवण्यात यश आले आहे विकास कामांना अधिक वेग देण्यासाठी आबांना निवडणूक जिंकावीच लागेल हा जणू काय तरुणाईने चंग बांधला आहे निवडणुकीचे अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिले असतानाच त्यांना तुतारी हे चिन्ह मिळाले या तुतारीच्या चिन्हावरती निवडणूक लढवून विजयश्री खेचून आणण्यात त्यांना यश येईलच असे पुणेकरांचे मत आहे तरुणांच्या गळ्यातील ताईत बनलेले आबा लवकरच लोकसभेत सदस्य म्हणुन जातील यात शंका नाही.