टाकळीभान चे दोन व कारेगाव इथून तीन तरुण आयोध्येसाठी सायकल वरती रवाना
टाकळीभान चे दोन व कारेगाव इथून तीन तरुण आयोध्येसाठी सायकल वरती रवाना
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथून दोन तरुण व कारेगाव येथील तीन तरुण अशा एकूण पाच जणांनी प्रभू श्री रामचंद्राचे जन्मस्थान असलेल्या अयोध्या येथे दर्शनासाठीनुकतेच सायकल वरती रवाना झाले आहेत. टाकळीभान येथील मनोज पवार व पंकज जाधव अशा दोन तरुणांनी सायकल वरती अयोध्या वारीचा निर्णय घेतला आणि तो सत्यात उतरवून ते नुकतेच सायकल वरती टाकळी भान ते अयोध्याकडे रवाना झाले व कारेगाव येथील सुनील पटारे, नानासाहेब गोरे, जालिंदर गोरे हे देखील सायकल वरती आयोजित कडे रवाना झाले.
अयोध्या वारी करायची तर ती सायकल वरती करायची असा मणी ध्यास धरलेले हे पाचही तरुण नुकतेच टाकळीभान येथून अयोध्याकडे रवाना झाले आहेत ते प्रथम श्रीक्षेत्र देवगड येथील शांती ब्रह्म गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांचे दर्शन घेऊन औरंगाबाद मार्गे अयोध्याकडे रवाना झाले आहेत. त्यांचा टाकळीभान ते आयोध्या असा एकूण बारा दिवसांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी टाकळीभान येथील ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात सत्कार करून त्यांना पुढील यात्रेसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या
यावेळी माजी सभापती नानासाहेब पवार उपसरपंच कान्हा खंडागळे, अभिमन्यू मगर ,आनंद कांबळे, सुरज कोकणे ,विलास सपकाळ ,सुरेश गायकवाड, आप्पा रणवरे ,मंगेश पटारे ,अवि लोखंडे, विकास मगर ,गौरव चितळे, सनी जाधव ,बालन परदेशी ,एकनाथ सावंत, गोरख खुरूद ,रामदास कांबळे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते