टाकळीभान ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडील इतर व्यक्तीने रेकॉर्ड जाळले ते पण हॉटेलच्या भट्टीत
टाकळीभान ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडील इतर व्यक्तीने रेकॉर्ड जाळले ते पण हॉटेलच्या भट्टीत
टाकळीभान- प्रतिनिधी -ग्रामपंचायत कर्मचारी पाणी पट्टी व घर पट्टीची वसुली करत असताना ,एका परमिट रूम मध्ये दुपारीच रंगीत पार्टीची तालीम करण्यात मग्न होऊन आपल्याकडील असलेले स्थानिक स्वराज्य संस्थेचे वसुलीचे आर्थिक दप्तर हॉटेलच्या तंदुरी रोटीच्या भट्टीत एका खाजगी व्यक्तीने फेकून दिल्याने गावात याविषयी एकच खळबळ उडाली आहे.
. श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान ग्रामपंचायत शासनाच्या निधीबाबत अग्रेसर समजले जाते गावाची लोकसंख्या मोठी असल्यामुळे शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो त्यामुळे गावातून ग्रामपंचायतीला नळपट्टी,घरपट्टी व गाळा भाडे याचा मोठा वसूल टाकळीभान ग्रामस्थांकडून पावती रूपाने ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांकडून गोळा केला जातो परंतु या कर्मचाऱ्यांना आपण एका महत्त्वाच्या संस्थेत कामाला असल्याचा त्यांना विसर पडला. आणि नशेत त्यांना आपण काय करत आहोत याचे देखील भान राहिले नव्हते. याचाच परिणाम तिथे त्यांची एका व्यक्तीची गाठ पडली. टेबल वरून झालेल्या वादात ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्याकडे असलेले रेकॉर्ड बुक पावती पुस्तके त्या कर्मचाऱ्याने हिसकावून घेऊन व रोटी बनत असलेल्या भट्टीमध्ये टाकून जाळून टाकले. गावात मोठ्या प्रमाणात गाळेधारक असून त्यामुळे या गाळा धारकाकडून मोठ्या प्रमाणात वसूल गोळा होतो दिवसभर किती वसूल गोळा झाला कारण वसुलीचे पावती पुस्तके हॉटेलच्या भट्टीत जळाल्यामुळे वसुलीचा आकडा कळला नाही ग्रामपंचायतचे पावती पुस्तक जाळण्याचे कारण काय हे गुलदस्त्यात असून हे जाळण्याचा हेतू काय याबाबत गावात उलट सुलट चर्चा सुरू असून या ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांवर स्थानिक नेते मंडळीचा अगर सरपंचाचा किंवा ग्रामसेवकाचा धाक राहिलेला दिसून येत नाही हे कर्मचारी पाणीपट्टी व घरपट्टी वसुलीचा बहाना करून खुलेआम रंगीत पार्टीत सतत मग्न असतात
यावर ग्रामपंचायत प्रशासन यावर काय कारवाई करते, याकडे गावाचे लक्ष लागले आहे