धार्मिक

विवाह समारंभात जगद्गुरु श्री संत तुकाराम मंदिर निर्माणकरीता दिड लाख रूपये देणगी.

विवाह समारंभात जगद्गुरु श्री संत तुकाराम मंदिर निर्माणकरीता दिड लाख रूपये देणगी.

 

टाकळीभान प्रतिनिधी :- टाकळीभान येथे अखंड हिदुस्थांनाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज मंदिर होणार असून ,सदर निर्माणसाठी कार्यासाठी टाकळीभान व पंचक्रोशीतील दानशूर भाविक वर्गणीसाठी उदंड असा प्रतिसाद देत असून, लग्न सोहळ्यातही सत्काराला फाटा देऊन, सत्काराची रक्कम मंदिर निर्माणकार्यासाठी देत आहेत.टाकळीभान येथील प्रगतशील शेतकरी व जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज महाराज मंदिराचे विश्वस्त राजेंद्र माने यांची पुतणी व ॲड्. विजयराव दिनकराव माने यांची सुकन्या ऋतुजा तसेच खुपटी येथील प्रगतशील शेतकरी विठ्ठल गणपत गव्हाणे यांचे चिरंजीव गौरव यांच्या शुभमंगल प्रसंगी सत्काराला फाटा देऊन अॅड विजय माने, रवीभाऊ माने, वअनिलराव माने परिवाराकडून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज मंदिर निर्माणकार्यासाठी ११,१११ रुपये देणगी व संपुर्ण माने परीवारातर्फे १,५१,६३० रूपये एवढी वर्गणी देऊन, सामाजिक भान ठेऊन एक चांगला पायंडा पाडला म्हणून, माने परिवाराला जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज मंदिराच्या वतीने,, छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती देऊन सन्मानित करण्यात आले,

     या शुभविवाह प्रसंगी माने परिवाराकडून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज मंदिराची रुपरेषा,मंदिर निर्माण आराखडा,एकुण अपेक्षित खर्च विवाहाला उपस्थित पाहुणे मंडळी, मित्र परिवार तसेच ग्रामस्थांना माहिती व्हावी यासाठी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज मंदिराबाबत व्हिडीओ चिञफीतद्वारे बनवून तो स्क्रिनवर दाखवण्याची व्यवस्था करण्यात आली होती,

      या उपक्रमाबाबत उपस्थितांनी माने परिवाराचे कौतुक करत आभार मानले .मंदिर निर्माण कार्याला १० मे रोजी अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सुरुवात होणार आहे.

मंदिर निर्माण करीता माने परीवारातर्फे देणगी देणारे देणगीदार 

.३५,०००रु – राजेंद्र व .ॲड्. कृपाल माने यांचे कडून तर .११,१११ रू – .सुनील जयकर माने यांच्याकडून.११,१११रु – श्री.सुबोध भास्करराव माने यांचे कडू ११,१११ रु.सुधाकर विठ्ठलराव माने यांचे कडून,११,१११ रु – .रंगनाथ संपत माने यांचेकडून ११,१११रु रुपये भाऊसाहेब परसराम माने यांचे कडून..७,७७७ रुपये, सचिन सुभाष माने यांचे कडून..७,७७७ रु .मदन परसराम माने यांच्याकडून५,५५५ रु .बाळासाहेब सटवाजी माने यांचेकडून

 ५,५५५ रु- .बाळासाहेब सटवाजी माने यांचेकडून ५,५५५ रु .सचिन व श्री.विक्रांत रघुनाथ माने यांच्याकडून ५,५५५रु .पंढरीनाथ परसराम माने यांच्याकडून ५,२०० रु .अमोल व किशोर अण्णासाहेब माने यांच्याकडून

 २,१००रु .नानासाहेब शंकरराव माने यांच्याकडून ५,००१ रु .दिपकराव अकोलकर यांचेकडून देण्यात आली, 

    यावेळी टाकळीभान येथील माने परिवाराकडून एकूण रक्कम १,५१,६३० रुपये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज मंदिर निर्माण करीता देणगी स्वरूपात स्वीकारताना मूळ प्रवराचे माजी संचालक मंजाबापू थोरात, उपसरपंच कानोबा खंडागळे, अभिजीत लेलकर, रामेश्वर आरगडे. पांडे काका आदींच्या उपस्थितीत स्वीकारताना दिसत आहे ,

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे