धार्मिक

महानुभाव पंथांच्या तीर्थक्षेत्राच्या विकासाकरता ६६ कोटी ५५ लाख ८३ हजार रुपये निधी मंजूर

महानुभाव पंथांच्या तीर्थक्षेत्राच्या विकासाकरता ६६ कोटी ५५ लाख ८३ हजार रुपये निधी मंजूर

 

टाकळीभान प्रतिनिधी (प्रतिनिधी) राज्यातील महानुभाव पंथांच्या मंदिर व आश्रमाच्या विकासाकरिता महायुती सरकारने ६६ कोटी ५५ लाख ८३ हजार रुपयांचा निधी मंजूर करून प्रशासकीय मान्यता दिलेली आहे.सदरचा निधी राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस व महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय आहे. त्याकरिता अखिल भारतीय महानुभाव पंथाचे अध्यक्ष श्री.कारंजेकर बाबा यांना त्याचे श्रेय असल्याचे कमालपूर येथील माजी सरपंच सचिन भास्करराव मुरकुटे यांनी म्हटले आहे. 

        राज्यातील महायुती सरकारने धार्मिक पर्यटन स्थळांना मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी महानुभाव पंथाच्या तीर्थक्षेत्र असलेल्या राज्यातील मंदिरांसाठी तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत ६६ कोटी ५५ लाख ८३ हजार रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता दिली आहे.त्यामध्ये श्रीरामपूर तालुक्यातील तीर्थक्षेत्र विकासासाठी ९ कोटी ५० लाख रुपये निधीचा समावेश असल्याचा श्री मुरकुटे यांनी सांगितले. त्याकरिता अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष कवीश्वर कुळाचार्य श्री. कारंजेकर बाबा व नाशिक येथील प्रकाश नन्नवरे यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री ना. श्रीमती सुनेत्राताई पवार व पर्यटन मंत्री ना.शंभूराजे देसाई यांची अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष श्री. कारंजेकर बाबा व प्रकाश नन्नावरे यांनी मुख्यमंत्री ना. फडणवीस यांच्यासह इतर मंत्र्यांची मुंबईत नुकतीच भेट घेऊन तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत राज्यातील विविध तीर्थक्षेत्रांना मदत करावी अशी मागणी केली होती.त्यानुसार राज्य शासनाने प्रादेशिक पर्यटन विकास योजना सन 2025-26 अंतर्गत पर्यटन संचालनालयाच्यावतीने या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

   त्यामध्ये राज्यातील विविध ठिकाणी असलेल्या महानुभाव पंथांच्या तीर्थक्षेत्राच्या विकासाकरता ६६ कोटी ५५ लाख ८३ हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. श्रीरामपूर तालुक्यातील पाच ठिकाणी महानुभाव आश्रम परिसरात भक्तनिवास बांधणे व विविध विकास कामांसाठी ९ कोटी ५० लक्ष रुपयांचा निधी देण्यात आला आहे. त्यामध्ये श्रीक्षेत्र डोमेग्राम ( कमालपूर ) चक्रधर स्वामी आश्रम २ कोटी रुपये, नाऊर येथील महानुभाव दत्त मंदिर २ कोटी रुपये,बेलापूर येथील चक्रधर स्वामी मंदिर २ कोटी रुपये,भोकर येथील गुंफेकर बाबा महानुभाव आश्रम १ कोटी रुपये व श्रीरामपूर येथील बेलापूर रोडवरील चक्रधर महानुभाव आश्रमासाठी २ कोटी ५० लाख रुपये निधीस प्रशासकीय मान्यता राज्य शासनाने दिली आहे. 

 राज्यातील तसेच श्रीरामपूर तालुक्यातील विविध महानुभाव आश्रम परिसरातील तीर्थक्षेत्र विकासाकरिता निधी मंजुरीसाठी पाठपुरावा करणारे अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष श्री.कारंजेकर बाबा तसेच राज्याचे मुख्यमंत्री ना. फडणवीस,उपमुख्यमंत्री ना. शिंदे,उपमुख्यमंत्री ना. श्रीमती सुनेत्रा पवार,पर्यटन मंत्री ना.देसाई यांच्यासह राज्य शासनाचे कमालपुर येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष भास्करराव मुरकुटे, माजी सरपंच सचिन मुरकुटे,दिगंबर बारस्कर, सरपंच सौ.स्वाती मुरकुटे अनिल गोरे,दिलिप मुरकुटे, रमेश मुरकुटे,कचरू पाटील गोरे,प्रभाकर गोरे,वाल्मीक गोरे,दत्तात्रय कारंजकर, गुलाब कारंजकर आदी ग्रामस्थांसह महानुभाव पंथांच्या भक्तांनी या महत्वकांक्षी शासनाच्या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त करून शासनाचे आभार मानले आहेत.

 

 अ.भा.महानुभाव परिषदेचे अध्यक्ष कारंजेकर बाबा व महायुती शासनामुळे ६६ कोटी ५५ लक्ष रुपयांचा निधी मंजूर – सचिन मुरकुटे

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे