गुन्हेगारीब्रेकिंग

प्रकाश चित्तेंवर महिलेच्या फिर्यादीवरून ॲट्रासीटी गुन्हा दाखल.

जिहादी बलात्कारी मुल्ला कटरवर हिंदुत्ववादी चित्ते एव्हढे मेहेरबान का...?चर्चेला उधाण.

प्रकाश चित्तेंवर महिलेच्या फिर्यादीवरून ॲट्रासीटी गुन्हा दाखल.

जिहादी बलात्कारी मुल्ला कटरवर हिंदुत्ववादी चित्ते एव्हढे मेहेरबान का…?चर्चेला उधाण.

 

 

श्रीरामपूर(प्रतिनिधी):- मुल्ला कटर आमचा कार्यकर्ता आहे त्याच्या विरोधात साक्ष देऊ नको तुला दोन लाख रुपये देतो नाहीतर तुला संपवून टाकू अशी धमकी स्वयंघोषित हिंदुत्ववादी नेता प्रकाश चित्ते व मुल्ला कटरचा भाऊ रिजवान यांनी मुल्लाने बलात्कार केलेल्या पिडीत मुलीला दिली म्हणून हिंदू धर्मवीर म्हणून स्वतःला मिरवणाऱ्या प्रकाश चित्ते सह मुल्ला कटरचा भाऊ रिजवान कुरेशी वर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाल्याने प्रकाश चित्ते हा मुल्ला कटरचा साथीदार असल्याचे या प्रकरणामुळे समोर आल्याने तालुक्यात खळबळ उडाली असून हिंदू धर्मीयांमध्ये चित्ते विरोधात प्रचंड चीड संतापाची लाट पसरली आहे.

 

            हिंदू अल्पवयीन मुली व महिलांवर अत्याचार बलात्कार करणाऱ्या शहरातील मुस्लिम मोहल्ल्यातील मुल्ला कटर याने

तेरा वर्षाच्या अल्पवयीन हिंदू मुलीवर पळवून नेऊन सलग तीन वर्षे अत्याचार केले व सोळाव्या वर्षी तिच्यावर बळजबरीने मातृत्व लादणाऱ्या मुल्ला कटरवर दुसऱ्या एका प्रकरणात बलात्काराचा गुन्हा दाखल करणाऱ्या एका मागासवर्गीय मुलीवर दबाव टाकून मुल्लाच्या विरोधात साक्ष देऊ नको तो आमचा कार्यकर्ता आहे अन्यथा तुला संपवून टाकू अशी धमकी देत जातीवाचक शिवीगाळ केली म्हणून प्रकाश चित्ते सह मुल्ला कटरचा भाऊ रिजवान कुरेशी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मुल्ला कटर प्रकरणात राज्यभर हिंदू धर्मियांनी निषेध करत मोर्चे काढल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली हा संवेदनशील विषय विधानसभेतही गाजला मुल्ला कटरला अटक केल्यानंतर त्याला सपोर्ट करणारे पोलिस निरीक्षक सानप व पोलिस कॉन्स्टेबल पंकज गोसावी यांना मुल्ला प्रकरण चांगलेच भोवले त्यांना निलंबित करण्यात आले.मुल्लाला त्याच्या साथीदारासह अटक केल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांना तुरुंगात भेटण्यासाठी प्रकाश चित्ते यांनी पोलिसांवर दबाव टाकल्याच्या संभाषणाची क्लिप तालुक्यात खूपच व्हायरल झाली होती.तेंव्हाच मुल्ला कटर व प्रकाश चित्ते यांचे कनेक्शन उघड झाले होते.

 

            याबाबत पीडित मुलीने स्वतः शहर पोलिस ठाण्यात रात्री उशीरा दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की,मुल्ला कटर याच्या विरोधात २०२२ मध्ये गु.र.नं.६६६/२०२२ नुसार बलात्काराची फिर्याद मी दिलेली आहे.सदरच्या गुन्ह्याबाबत श्रीरामपूर कोर्टात सध्या सुनावणी चालू असून त्यासाठी मला पुण्यावरून नेहमी त्यासाठी जावे यावे लागते.आठ ते दहा दिवसापूर्वी याच कामानित्ताने मी श्रीरामपूर कोर्टात आले होते कोर्टाचे सर्व कामे आटोपून मी पुण्याला जाण्यासाठी नेवासा रोडवरील रेल्वे बोगदा मार्गे जात असताना पाठीमागून येऊन प्रकाश चित्ते यांनी मला अडवले व मुल्ला कटर हा माझा कार्यकर्ता आहे त्याने काहीच नाही केले असे सांग त्याच्या विरोधात साक्ष देऊ नको तुला दोन लाख रुपये देतो नाहीतर तुला संपवून टाकू अशी धमकी दिली. तु जर आमचे ऐकले तर पुढच्यावेळी येशील तेव्हा मुल्लाचा भाऊ रिजवान हा तुला भेटून अगोदर पन्नास हजार रुपये देईल व उरलेली रक्कम काम झाल्यावर देऊ असे प्रकाश चित्ते म्हटल्याचे मुलीने फिर्यादीत म्हंटले आहे.

 

            फिर्यादीत पुढे म्हंटले आहे की,माझ्या केसच्या संदर्भात मी नेवासा फाटा येथे सोमवारी रात्री आले तेथे एका लॉजवर मुक्काम केला व दुसऱ्या दिवशी सकाळी त्याठिकाणी मुल्ला कटरचा भाऊ रिजवान आला व मला दमदाटी करून श्रीरामपूर कोर्टात नेऊन कोऱ्या कागदावर माझी सही व अंगठा त्याने घेतला.त्यानंतर घाबरलेल्या अवस्थेत मी पुण्याला जाण्यासाठी बसस्टँडवर आले असता त्याठिकाणी सुद्धा मुल्ला चा भाऊ रिजवान आल्याचे मी बघितल्यावर तेथून मी रिक्षाने नेवासा रोडच्या दिशेने जात असताना रिजवान मागून येऊन मी बसलेल्या रिक्षाला अडवून त्याने रिक्षा ड्रायव्हरला तेथून जाण्याचे सांगून मला जातीवाचक शिवीगाळ करून दमदाटी करत असताना माझ्या ओळखीचा एकजण तेथे आला व त्याने मला मदत केली तेंव्हा तेथून रिजवान निघून गेला.तेंव्हा माझी पूर्ण खात्री झाली की या सर्व प्रकारामागील मुख्य सूत्रधार प्रकाश चित्ते असून तेच हे सगळे करत आल्याचे पीडित मुलीने फिर्यादीत म्हंटले आहे.

 

            पीडित मुलीच्या फिर्यादी वरून गु.र.नं.०६७८/२०२५ नुसार भा.न्या.सं २०२३ कलम २३२,१२६(२),३५१(२),४९ व अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कलम ३(१)(r),३(१)(s) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून मुल्लाचा भाऊ रिजवानच्या मुसक्या पोलीसांनी आवळल्या असून दुसरा आरोपी प्रकाश चित्ते फरार असल्याचे पोलिस ठाण्यातून सांगण्यात आले.पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे.

5/5 - (1 vote)
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे