महाडिक सेंटर ते तिळापुर अपूर्ण रस्त्याला अखेर दोन वर्षांनी मुहूर्त
राहुरी तालुक्यातील महाडिक सेंटर ते तिळापुर रस्त्याचे काम चालू होऊन दोन ते अडीच वर्ष उलटून गेले मध्येच कोरोना कारण दाखवत काम बंद झाले होते आत्ता काम चालू झाली असता बोरीफाटा ते कोपरे रस्त्याचे काम निकृष्ट पद्धतीने चालू असल्याने कोपरे ग्रामस्थांनी रात्री उशिरा होत असलेले काम दिसून येत नव्हते त्यामुळे ग्रामस्थांनी काम बंद करण्यास सांगितले व काम बंद ही झाले कोपरेगाव चे उपसरपंच लक्ष्मण जगताप यांनी रस्ता चालू असलेल्या कामाकडे पाहणी केली असता रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे मत व्यक्त केले तसेच उसाच्या चुट्टी ने रस्ता उघडत आहे. हे रस्ता करणाऱ्या व्यक्तींना तसेच ठेकेदाराच्या प्रतिनिधीला दाखवले असता, हे काम असेच असते तुम्हाला माहित नाही. असे त्यांना उत्तर देण्यात आले रस्त्यावर डांबर खडी पसरवत असताना माती पूर्णपणे साफ करणे गरजेचे होते परंतु माती न काढल्याने रस्त्याचे काम निकृष्ट होत आहे. याबाबत पत्रकार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधला असता. ठेकेदाराची पाठराखण करत रस्त्याची दुरुस्ती दोन वर्षाचा आराखड्यात आहे रस्ता होऊद्या खराब झाला तर त्या ठेकेदाराकडून परत रस्ता करून घेऊ, अशी माहिती देण्यात आली सर्वसामान्य नागरिक तक्रार करणार कोणाकडे सर्वच जर एकाच माळेचे मणी असतील तर अशी ग्रामस्थांची चर्चा होताना दिसून येत आहे. तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामाकडे त्वरित लक्ष देऊन काम योग्य व भक्कम पद्धतीने करून घ्यावे अशी मागणी होत आहे. यावेळी सरपंच प्रतिनिधी जाधव, घोडके, जगताप व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.