इलेक्ट्रिक पोलवरील विद्युत वाहक तारा चोरीला गेल्याने उंदिरगाववात पाणी टंचाई
उंदिरगाव – श्रीरामपूर तालुक्यातील उंदिरगाव येथे गट नंबर ७५ मध्ये ग्रामपंचायत बोरवेलला पाणी पुरवठा करण्यासाठी चार वर्षांपूर्वी चोविस तास वीज मिळण्याकरिता स्वतंत्र विज व्यवस्था करण्यात आली आहे. या सात पोलवरील विद्युत वाहक तारा चोरीला गेल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.
उंदीरगाव येथील बीसी नाला परिसरामध्ये उंदिरगाव आऊट साईटला पाणी पुरवठा करण्यासाठी बोरवेल घेतला असून त्या बोरवेल भोकर फिडर वरून वीज जोडणी केली आहे. या वीज जोडणी वरील पाच वाडी ते सात वाडी दरम्यान असलेल्या इलेक्ट्रिक पोल वरून विद्युत वाहक तारा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याने गावाचा पाणीपुरवठा खंडित झाला आहे.गेल्या आठ दिवसांपासुन विजेच्या तारांची चोरी झाली असली तरी या बाबत पोलीसात तक्रार दाखल केली नाही. उंदिरगाव ग्रामपंचयत ने याबाबत ची लेखी कल्पना हरेगाव येथील सबस्टेशनला दिली आहे. महावितरणचा हद्दीचा प्रश्न हरेगाव व भोकर सबस्टेशन यांच्यात निर्माण झाल्याने याबाबत पोलिसात तक्रार दाखल झाली नाही. ग्रामपंचायत उंदिरगाव पोलिसात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला असता त्यांची तक्रार नोंदवून घेण्यात आली नाही. ज्या भागातून विद्युत वाहक तारा चोरीला गेल्या त्या परिसरात वेड्या बाभळीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात असल्याने जाणूनबुजून खोडसाळपणा करण्याकरीता या विद्युत वाहक तारा चोरल्या असाव्यात असा संशय ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.उन्हाळा सुरु होण्याअगोदरच नागरिक चोरट्यांच्या पराक्रमामुळे पाणी टंचाईला सामोरे जात आहेत.
Rate this post