जय जवान सैनिक पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण संस्था बनवत होती देशी दारू
संस्था बनवत होती देशी दारू..
जय जवान सैनिक पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण संस्था बनवत होती देशी दारू
सुमारे 19 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
राज्य उत्पादन शुल्क औरंगाबाद विभागाने दिनांक 27 12 2019 रोजी मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे आडगाव बुद्रुक तालुका जिल्हा औरंगाबाद येथील जय जवान सैनिक पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण संस्थेच्या दोन खोल्यात छापा टाकून बनावट देशी दारू सह दारू उत्पादनासाठी लागणारे साहित्य असा एकूण 19 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पाच इसमांना अटक केली
याबाबत अधिक माहिती अशी की आडगाव बुद्रुक तालुका औरंगाबाद येथील जय जवान सैनिक पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण संस्थेचा मालक अशोक डवले हा अन्याय साथीदारांसह सदर प्रशिक्षण संस्थेच्या मोठ्या दोन खोल्यांमध्ये बेकायदेशीरपणे देशी दारू उत्पादनाचा कारखाना चालवीत आहे अशी खबर मिळाली होती त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क औरंगाबाद शहर विभागाचे निरीक्षक शरद फटांगडे व पोलीस निरीक्षक जावेद कुरेशी यांच्या पथकाने आयुक्त श्री कांतीलाल उमाप व विभागीय उपायुक्त प्रदीप पवार व अधीक्षक औरंगाबाद सुधाकर कदम यांच्या मार्गदर्शक मार्गदर्शनाखाली सोमवारी कबरीच्या ठिकाणी छापा टाकला असता त्याठिकाणी पाच इसमांच्या देशी दारू टॅंगो 180 मिली असलेल्या एकूण 7132 बनावट 17 हजार 250 बाटल्यांवर लावण्यात येणारे लेबल सुमारे तीन हजार एकाने बाटल्या 1750 खोके इलेक्ट्रिक मोटार प्लॅस्टिक कॅन साठविण्याचे इत्यादी सुमारे 19 लाख सात हजार 160 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर बनावट दारू निर्मिती करण्यात येणाऱ्या कारखान्यात मिळून आलेले इसम एक जितेंद्र सिंग रवी सिंग जय बली सिंग सर्व राहणार बरसली जिल्हा सिद्धी मध्य प्रदेश तसेच चार प्रशांत अनिल खैरनार राहणार धुळे पाच चैतन्य रामकृष्ण नमस्कर बेगमपूर औरंगाबाद यांना ताब्यात घेऊन मुंबई दारूबंदी कलम 1949 चे अजामीनपात्र कलमान्वये अन्य आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद केलेली आहे सदर गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार अशोक किसन ढवळे व त्याचे अन्य एक साथीदाराचा शोध घेण्यात येत आहे अटक आरोपींना आज न्यायालयाच्या समक्ष हजर केले असता न्यायालयाने अटक आरोपींचा दोन दिवसाचा पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे
सदर छापा पथकात निरीक्षक शरद फटांगडे निरीक्षक जावेद कुरेशी दुय्यम निरीक्षक गणेश पवार भारत दौंड दुय्यम निरीक्षक अशोक सपकाळ जवान अनिल जायभाये योगेश कल्याणकर विजय मकरंद किसन सुंदर डे यांचा समावेश होता गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक जावेद कुरेशी करत आहे