*ही सेवानिवृत्ती नसून,नवीन जीवनाची आवृत्ती*–प्रतीक्षा सुद्रीक
*ही सेवानिवृत्ती नसून,नवीन जीवनाची आवृत्ती*–प्रतीक्षा सुद्रीक
सोनई–वडील अशोक क्षीरसागर व सुखदेव जामकर हे वयाच्या ३५ वर्ष सेवा करून आज सेवानिवृत्त होत आहे, पण त्यांचा यापुढील कार्यकाळ खरी जीवन जगण्याची नवीन आवृत्ती सुरू झाल्याचे मत मुलगी सौ. प्रतीक्षा गोपाल सुद्रीक यांनी व्यक्त केले.
एस.टी. महामंडळातील नेवासा आगार येथील वाहतूक नियंत्रक अशोक क्षीरसागर व सुखदेव जामकर हे वयाच्या ५८ व्या वर्षी सेवानिवृत्त झाले तेव्हा सौ. सुरेखा क्षीरसागर व संजीवनी जामकर यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला,त्यावेळी त्या बोलत होत्या.
[*मंत्री शंकरराव गडाख हे कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार होते, मात्र राज्यातील राजकीय घडामोडीमूळे उपस्थित न राहता त्यांनी शुभेच्छा संदेश द्वारे मेसेज पाठवला*.
प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य पुरोषोत्तम सर्जे म्हणाले,सेवा करत असताना नौकरी च्याही पलीकडे जाऊन एक सामाजिक बांधिलकी म्हणून ठीक ठिकाणी प्रामाणिक,तळमळीने जनतेसाठी सेवेचे काम केले.
यावेळी महामंडळाचे अधिकारी दिनकर लिपाने,प्रगतशील शेतकरी जालिंदर येळवंडे, शिवाशेठ बाफना,तेली समाजाचे संघटक विशाल पवार,अनिल जरे यांनी मत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.
अशोक क्षीरसागर यांनी म्हटले की, मला अधिकारीच्या मार्गदर्शनाखाली व कर्मचारीच्या सहकार्यानेच कार्य करता आले.याचे श्रेय अधिकारी व कर्मचारी यांना देतो.
संजय क्षीरसागर यांनी ह्या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला.
कार्यक्रमास अध्यक्ष स्थानी नेवासा आगार प्रमुख किशोर आहेर होते.यावेळी यांत्रिक कार्यशाळा प्रमुख संगीता होडणर,माजी आगार प्रमुख देवकर, स्थानक प्रमुख अनिल पटारे, जेष्ट मारुती सुद्रीक,डॉ.ज्ञानेश्वर दरंदले,सौ.शैलाताई सर्जे, विलास पवार,शेवंगावचे राजू राऊत,बंडू जाधव,विजय लोखंडे,मनोहर सुद्रीक,मधुकर सुरसे,कैलास क्षीरसागर, सहायक निबंधक प्रमोद खेडेकर, पुणे येथील गोपाल सुद्रीक,अमोल जामकर, रवींद्र खेडेकर,नामदेव गावडे,अशोक गावडे,शशिकला नजन,प्रियांका गावडे,माजी सरपंच बाळासाहेब जामकर, अंबादास राशीनकर,अशाबाई राशीनकर ,आत्माराम बुचुडे,रामदास जामकर,ज्ञानेश्वर जामकर,व संजय जामकर, सह आदी उपस्थित होते.
सूत्रसंचालन रमेश दाणे,प्रस्ताविक आगार लेखाकारक वासुदेव आव्हाड,तर आभार पत्रकार विजय खंडागळे व अनिल जरे यांनी मानले.