शिवरायांची जयंती नाचून नाही तर वाचून साजरी करावी
शिवरायांची जयंती नाचून नाही तर वाचून साजरी करावी
शिवचरित्रकार धर्मराज करपे यांचे आवाहन
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा तरुणांना प्रेरणादायी इतिहास आहे
शिवछत्रपती एक आदर्श राजे होते प्रजाहितदक्ष योग्य न्याय देणारे स्त्रियांचे रक्षण करणारे मानव जातींचे रक्षण करणारे त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती नाचून नाही तर त्यांचा इतिहास पुढे ठेवून आजच्या तरुणांनी आपली वाटचाल करावी त्याचे जीवन यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन शिवचरित्रकार धर्मराज करपे यांनी केले.
गेवराई तालुक्यातील मौजे भेंड खुर्द येथे भूमिपुत्र प्रतिष्ठाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त
शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवचरित्रकार धर्मराज करपे बोलत होते. व्यासपीठावर भूमिपुत्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक उबाळे, सिद्धेश्वर जंगले, दैनिक लोकमतचे पत्रकार विनायक उबाळे, सरपंच धनेश्वर खेत्रे, उपसरपंच प्रदीप खांडे, युवा उद्योजक राधेश्याम शिंदे, महादेव शिंदे, अनंत कोळपे, युवराज राजपूत, प्रमोद तांगडे, सुधाकर शिंदे, उपसरपंच आबासाहेब उबाळे सह आदी प्रतिष्ठित नागरीक व ग्रामस्थ उपस्थित होते.
पुढे बोलताना धर्मराज करपे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवन चारित्र्य व शिक्षण,व्यसनमुक्ती करिअर धर्म पर्यावरण असे वेगवेगळ्या पैलवर शिवरायांच्या जीवन चरित्राची सांगड घालून उपस्थित श्रोत्यांचा संवाद साधला.भेंड खुर्द मधली जयंती एक आदर्श जयंती साजरी केली कारण ङीजे मुक्त वर्गणी मुक्त व व्यसनमुक्त अशी ही जयंती भूमिपुत्र प्रतिष्ठानने साजरी केली व गावातील उच्च शिक्षण घेत असलेल्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी झालेल्या वीस विद्यार्थ्यांचा भूमिपुत्र प्रतिष्ठानने गौरव करण्यात आला. शैक्षणिक सामाजिक कृषी विषयक अशा विविध आघाड्यावर भूमिपुत्र प्रतिष्ठान आदर्श व शाश्वत असे कार्य करत आहे. दरम्यान यावेळी गावातील पोलीस उपनिरीक्षक हनुमंत फरताडे, दिगंबर उबाळे, रणजीत शिंदे, सुमित उबाळे, रोहिणी उबाळे, स्नेहल पंडित, मयूरी उबाळे, ओमकार शिंदे, गीता नवगिरे, अर्जुन खांडे, अजय जाधव, ज्ञानेश्वरी शिंदे, ओम खांडे, अभिषेक कोळपे, उद्धव जाधव, प्रगतिशील शेतकरी राम उबाळे, प्रगतिशील शेतकरी सोमनाथ कोळपे, किरण शिंदे यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थित शिवप्रेमींना महादेव शिंदे यांच्या वतीने अन्नदान करण्यात आले. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचलन सचिन शिंदे यांनी तर आभार सुधाकर शिंदे यांनी व्यक्त केले.