दशक्रिया विधी सोहळ्यात आलेल्या पाहुण्यांवर व परिसरातील नागरिकावर पिसाळलेल्या कुत्र्याने 15 जणांनावर हल्ला करून चावा घेतला,
टाकळीभान प्रतिनिधी- दशक्रिया विधी सोहळ्यात आलेल्या पाहुण्यांवर व परिसरातील नागरिकावर पिसाळलेल्या कुत्र्याने 15 जणांनावर हल्ला करून चावा घेतला,
श्रीरामपुर तालुक्यातील खोकर येथील सिन्नरकर वस्ती व लगतच असलेली, वडाळामहादेव येथील उघडे वस्ती परीसरात ही घटना घडली.याबाबत समजलेली सविस्तर माहीती अशी शुक्रवार दि ०५ रोजी वडाळा महादेव शिवारातील उघडे वस्तीवरील नागरीक हुसेन चॉंदशहा पठाण (वय४२) हे पहाटे प्रभातफेरी करत असताना अचानक त्यांच्यावर पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला करत डाव्या पायाला चावा घेतला.त्यानंतर काही वेळाने याच परीसरात राहणार्या दत्तु काळु पगारे(वय२७) यांच्यावर घरासमोरच पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केला यामधे पगारे यांच्या तोंडाला चावा घेतल्याने गंभीर जखम झाली.यामधुन स्वत:ची सुटका करत असताना कुत्र्याने लगतच असलेल्या पगारे यांचा ७ वर्षाचा मुलगा सुनिल व ४ वर्षांची मुलगी लक्ष्मी हीच्यावरही हल्ला चढवला.यानंतर सकाळी ९ च्या सुमारास लगतच सिन्नरकर वस्ती येथे दशक्रिया विधी संपन्न होत असताना तेथे आलेल्या नातेवाईकांना या पिसाळलेल्या कुत्र्याचा फटका बसला.जेऊर येथुन आलेले निलेश रामचंद्र भोंदे(वय ३७),श्रीरामपुर येथील मीरा दिलीप गितेवय(वय५५),वळदगाव येथील सागर माळी(वय३२),खोकर येथील चंद्रकला दिलीप चव्हाण, आदिंसह १४ ते १५ जणांवर या पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला करत चावा घेतला.हे सर्व घडत असताना परीसरात एकच धांदल उडाली व या कुत्र्याच्या दहशतीने भीतीचे वातावरण तयार झाले.
यानंतर सर्व जखमींनी तातडीने माळवाडगाव, वडाळामहादेव, श्रीरामपुर या आरोग्य केंद्रावरती धाव घेतली. तेथील आरोग्यसेवकांनी प्राथमिक उपचार करत जिल्हा रुग्णालय अहमदनगर येथे सदर जखमींनी लसीकरणासाठी पाठवले.जखमींवर जिल्हा रुग्णालयात लसीकरण करण्यात आले.
पिसाळलेला कुत्रा चावल्यानंतर दिली जाणारी लस ही फक्त जिल्हा रुग्णालय अहमदनगर येथेच उपलब्ध असते.स्थानिक आरोग्य केंद्रामधे पाळीव कुत्राची लस उपलब्ध असते.आजच्या जखमींना योग्य तो प्राथमिक उपचार करत आपण तातडीने अहमदनगर जिल्हा रुग्णालयात आपण पाठवलले.आणि तिथे त्यांना योग्य लसीकरण करण्यात आले.
– डॉ. उमेश लोंढे ( वैद्यकीय अधिकारी, माळवाडगाव आरोग्य केंद्र)