केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान आळंदीतील कार्यक्रमाला विशेष अतिथी*

*केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान आळंदीतील कार्यक्रमाला विशेष अतिथी*
आळंदीतील गीत भक्ती अमृत महोत्सव इंद्रायणी तीरावर भरलेला आहे दिनांक 4 ते 11 या कालावधीत देशभरातील विशेष अतिथी आमंत्रित आहे यामध्ये गुरु गोविंद देवजी गिरी महाराज राम मंदिर अयोध्या चे कोषाध्यक्ष यांचा 75 वा वाढदिवस निमित्त भरीव कार्यक्रमाचे आयोजन असून आजच्या कार्यक्रमाला केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान विशेष अतिथी म्हणून निमंत्रित होते आपल्या मनोगत मध्ये राज्यपाल अरिफ मोहम्मद खान म्हणाले की” संतो भूमी तपसा धर्यन्ति” म्हणजे तपश्चर्याने आणि भक्तीने देशाचे अस्तित्व अबाधित राहते तसेच या भूमीला संतांचा वारसा आहे असे आळंदीच्या भूमीचे त्यांनी वर्णन केले.
मानव जातीचे कल्याण हे स्वामीजींचे ध्येय आहे असे गौरव उद्गार त्यांनी गुरुगोविंद देव जी गिरी महाराज यांचे बद्दल काढले आजच्या दिवशी षटतिला एकादशी या दिवशी स्वामी गुरु गोविंद देव गिरी महाराज यांचा जन्म झाला त्यांचा जन्मोत्सव आज साजरा करण्यात आला आजच्या दिवसाचे अवचित्त साधून वेध शास्त्र संवाद सत्राचे आयोजन करण्यात आले होते त्यायोगे गुरु शिष्य परंपरेतला वारसाही जोपासण्यात आला संतांचा वारसा लाभलेल्या भूमीमध्ये हा जन्मोत्सव होत असल्याबद्दल मोठ्या प्रमाणात वेदपाठ आणि अभ्यासक यांची मांदियाळी अलंकापुरी नगरीत भरलेली आहे तसेच गुरुगोविंद देव जी महाराज यांनी सांगितल्याप्रमाणे सुमारे 500 परदेशी नागरिक या कार्यक्रमासाठी आळंदी नगरीमध्ये आलेले आहे