10 ते 15 वर्षापासून भेर्डापूर मधील प्रलंबित रस्ता अखेर लोकसहभागातून…
10 ते 15 वर्षापासून भेर्डापूर मधील प्रलंबित रस्ता अखेर लोकसहभागातून…
बाराचारी रस्ता हा विशेषतःपावसाळ्यात दळणवळणासाठी फार कठीण होता.या रस्त्यावरून दुचाकीवर प्रवास करणे सुद्धा अवघड होते.यात शेतकरी वर्गाची व्यथा खूप वाईट होती.रात्री -बेरात्री पाऊस झाला की मोठ-मोठी खड्डे पाण्याने भरलेले असायची त्यामुळे रस्त्यावरील प्रवाशांची साधने चिखलात गुंतवून राहत असत.अचानक एखादे रूग्ण दवाखान्यात दाखल करायचे झाले तर बैलगाडी शिवाय पर्याय नव्हता. १५ ते २० वर्षांपासून ह्या रस्त्याला निधी मिळावा म्हणून गाव पातळीवरून पंचायत समिती , जिल्ह्या परिषद , आमदार, खासदार निधी साठी अनेक वेळा मागणी केली होती पण ती प्रत्येक्षात अजून अंमलात आली नाही.म्हणून लोकसहभागातून बाराचारी रस्त्या आज दिनांक २४जूलै २०२२ रोजी बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असलेल्या बाराचारी रस्त्याला मुरूम टाकून मजबूत करण्यास प्रारंभ झाला.याप्रसंगी भेर्डापूर गावातील प्रा. डॉ.बाबासाहेब पवार,उपसरपंच प्रतापराव कवडे, बाळासाहेब धनवटे,लक्ष्मण कसबे, चंद्रकांत कांदळकर, महेश बडाख, सुनिल पवार, बाळासाहेब गोराणे, बाळासाहेब शिवरकर विष्णु कवडे, नानासाहेब तनपुरे, सुनिल कहांडळ,अनिल दांगट, भाऊसाहेब कांबळे, सुखदेव गोराणे, निलेश शिवरकर , सर्जेराव गोराणे आदींचे बाराचारी परिसरातील नागरिकांचे बहुमोलाचे सहकार्य लाभले आहे