कर्जत तालुक्यातील अंबालिका साखर कारखाना येथे शिवस्मित मल्टीस्टेटच्या चौथ्या शाखेचे उदघाटन
कर्जत तालुक्यातील अंबालिका साखर कारखाना येथे शिवस्मित मल्टीस्टेटच्या चौथ्या शाखेचे उदघाटन
कर्जत तालुक्यातील धालवडी सारख्या छोट्याशा गावात जन्म घेतलेले गोकुळ पवार यांनी आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर बांधकाम क्षेत्रात व्यवसाय सुरू केला होता परंतु पवार यांना वाटले की आपण सामान्य नागरिकांसाठी त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी काहीतरी नवीन केले पाहिजे. आणि या विचारातूनच त्यांनी शिवस्मित अर्बन मल्टीस्टेट बँक सुरू करण्याचे निर्णय घेतले आणि अवघ्या चार वर्षाच्या कार्यकाळात एकुण चार शाखा सुरू केल्या. प्रथम कर्जत तालुक्यातील कुळधरण येथे पहिली शिवस्मित अर्बन मल्टीस्टेटची शाखा सुरू केली तर दुसरी शाखा पुण्यातील नरे या ठिकाणी सुरू करण्यात आली. तर तिसरी शाखा दौंड तालुक्यातील वरवंड येथे सुरू करण्यात आली आणि आता चौथी शाखा कर्जत तालुक्यातील अंबालिका साखर कारखाना येथे नवीन शाखेचे उद्घाटन अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भाजपाचे नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य शांतीलाल कोपनर होते. यावेळी शिवस्मित अर्बन मल्टीस्टेटचे संस्थापक अध्यक्ष गोकुळ पवार बोलताना म्हणाले की मी शेतकरी कुटुंबात जन्माला आलो असुन माझे आई वडील शेतकरी आहेत. मी माझे शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रथम बांधकाम व्यवसायात प्रवेश केला होता. परंतु सामान्य नागरिकांच्या अडीअडचणी नेहमी सतावत होत्या की आपण सामान्य नागरिकांसाठी काहीतरी केले पाहिजे शेतकरी आणि छोट्या मोठ्या व्यावसायिकांना आर्थिक मदत होईल व शेतकरी किंवा सामान्य व्यवसायिक स्वावलंबी होतील यासाठी मनात विचार घोळत होते. आणि त्यातूनच शिवस्मित अर्बन मल्टीस्टेट या नावाने बँकेची स्थापना करण्याचे ठरवले आणि पहिली शाखा कुळधरण येथे दिनांक १४ डिसेंबर २०१८ रोजी सुरू करण्यात आली. त्यानंतर ३० मार्च २०१९ रोजी पुण्यातील नरे येथे दुसरी शाखा सुरू केली. आणि त्यानंतर २५ सप्टेंबर २०२० रोजी दौंड तालुक्यातील वरवंड येथे तिसऱ्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. आणि आता कर्जत तालुक्यातील अंबालिका साखर कारखाना येथे चौथ्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले आहे. या चार शाखेपैकी तीन शाखा स्वतःच्या मालकीच्या जागेत आहेत. असे पवार यांनी यावेळी बोलताना सांगितले. पवार म्हणाले की आज पर्यंत सर्व शाखांमधून १८ कोटींच्या वर ठेवी असून तीन शाखा स्वमालकीच्या जागेत असुन शिवस्मित मल्टीस्टेटची अडीच कोटीची मालमत्ता आहे. या उदघाटन प्रसंगी खा. सुजय विखे पाटील, सुनीलदादा धांडे आमदार, बीड, सुवेंद्र गांधी व्हा.चेअरमन नगर अर्बन बँक, संतोष नाना भंडारी, शिवस्मित अर्बन मल्टीस्टेटचे व्हाईस चेअरमन सुदर्शन कोपनर, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रिया पवार , बाळासाहेब मुळीक, शांतीलाल कोपनर , नारायण मोरे, डॉ सुनील गावडे तालुकाध्यक्ष भाजपा कर्जत, अशोक खेडकर , कैलास शेवाळे, शंकर देशमुख , सचिन पोटरे जिल्हा सरचिटणीस भाजपा , राजेंद्र गुंड उपसभापती पंचायत समिती कर्जत , हेमंत मोरे , सौ. शितल गावडे सरपंच बारडगाव सुद्रिक, लता गावडे उपसरपंच बारडगाव सुद्रिक आदी मान्यवर उपस्थितीत होते.