श्रीमंत उर्जितसिंह शितोळे सरकार यांनी माऊलींच्या पालखी सोहळ्या मध्ये सेवेला प्रारंभ केलेल्या काळाला झाली 52 वर्ष*

श्रीमंत उर्जितसिंह शितोळे सरकार यांनी माऊलींच्या पालखी सोहळ्या मध्ये सेवेला प्रारंभ केलेल्या काळाला झाली 52 वर्ष
*वारकरी समाजाच्या वतीने त्यांच्या सुवर्णमहोत्सवी सेवेचा गौरव व कृतज्ञता समारंभ साजरा झाला*
फलटण (दि.२) संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा फलटण मुक्कामी असताना सकाळी १०:३० वा फलटण पालखी तळ तेथे अंकली (बंगळूर) तेथील उर्जीत सिंह शितोळे सरकार यांचा पालखी सोहळ्यातील ५२ वर्ष कार्यकाल पूर्ण केला म्हणुन वारकरी समाजाच्या आणि श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी यांचेवतीने त्यांच्या सुवर्णमहोत्सवी सेवेचा गौरव व कृतज्ञता समारंभ आज साजरा झाला. अशी माहिती हभप चैतन्य महाराज कबिर बुवा आळंदी यांनी दिली आहे, ऊर्जित सिंह शितोळे सरकार हे माऊलींचे अश्व हीरा आणि मोती यांचे प्रथा परंपरेने यांचे सोबत माऊलींच्या पालखी सोहळ्यात पायी वारीने आळंदी ते पंढरपूर चालत असतात, जागतीक महामारी ने गेले दोन वर्ष माऊलींची पालखी एस टी बस ने होत होती, या कालखंडानंतर पायी सोहळा चालू झाला आहे . ऊर्जीत सिंह शितोळे सरकार यांनी ५२ वर्ष हा सोहळा सेवे चा प्रवास करत असेल बाबत या कार्यक्रमाचे वारकरी समाजाने नियोजन केलें.असेलच हभप श्री चैतन्य महाराज कबिरबूवा यांनी सांगीतले आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी चे प्रमूख विश्वस्त ॲड विकास ढगे. विश्वस्त विकास ढगे .क
व्यवस्थापक माऊली विर. ह भ प निवृत्त न्यायाधीश श्री विठ्ठल महाराज वासकर .श्री बाळासाहेब चोपदार. श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान पंढरपूर चे विश्वस्त श्री जळगावकर महाराज. श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहोळा दिंडी समाज संघटनेचे अध्यक्ष ह भ प भाऊ महाराज गोसावी.सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री अजय बन्सल साहेब.सोलापूर जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीमती तेजस्विनी सातपुते मॅडम. वारकरी संप्रदाय फडकरी दिंडी संघटनेचे अध्यक्ष श्री बाळासाहेब उखलीकर महाराज.वारकरी साहित्य परिषदेचे विश्वस्त श्री एकनाथ खडसे महाराज हांडे राजूरकर.ह भ प श्री भाऊ महाराज फुरसुंगीकर यांचे प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला सूत्रसंचालन व निवेदन ह भ प श्री चैतन्य महाराज कबिरबुवा यांनी केले याप्रसंगी अंदाजे 400 हुन जास्त दिंडी प्रमुख उपस्तिथ होते तसेच श्री शितोळे सरकार यांची ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी ची ग्रंथ तुला करण्यात आली व ते ग्रंथ वारकऱ्यांना वाटण्यात आले आहेत अशी माहिती हभप चैतन्य महाराज कबिर बुवा आळंदी यांनी दिली आहे.