संपादकास अरेरावी करणाऱ्या सरपंच पतीवर पोलिसांनी केली कारवाई

संपादकास अरेरावी करणाऱ्या सरपंच पतीवर पोलिसांनी केली कारवाई.
श्रीरामपूर तालुक्यातील वांगी बुद्रुक ग्रामपंचायत चे सरपंच पती नवनाथ बिडगर याने रूद्रा न्यूजचे संपादक तसेच दैनिक जलभूमी पत्रकार एन डी चोरमले यांना बातमी लावण्याच्या कारणावरून अरेरावीची भाषा वापरून धमकी दिल्याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी कारवाई करत आरोपीस ताब्यात घेतल्यानंतर गावातील ज्येष्ठ नागरिक राऊसाहेब माने, कैलास पिसाळ, बाजीराव ठोंबरे, सोमनाथ पारखे, ज्ञानदेव लकडे, केशव विटनोर, संजय भिसे, बाळासाहेब माने, जगन्नाथ बीडगर यांनी येऊन माफी मागितल्याने सरपंच पती व त्यांच्या सहकाऱ्यांनी जो काही प्रकार केला होता त्यांची चूक लक्षात आल्याने हीच गोष्ट काही पत्रकारांच्या ही लक्षात आल्याने मनाचा मोठेपणा दाखवत आपल्याच गावाची चवजाऊ नये म्हणून आलेल्या नागरिकांच्या विनंतीला मान देऊन पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत दाखल होणारा गुन्हा दाखल न करता पुढील अनर्थ टाळून मनाचा मोठेपणा दाखवत वाद मिटवण्यात आला. वरिष्ठांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक मच्छिंद्र खाडे सहाय्यक फौजदार गायमुखे पोलीस हेड कॉन्स्टेबल पवार, एन आर बर्डे यांनी त्यांची कारवाई करत आरोपीस तालुका दंडाधिकारी यांच्या समोर हजर करून आरोपी नवनाथ बिडगर त्याच्यावर पुढील कारवाई करण्यात आली. यावेळी एस न्यूजचे संपादक जयेश सावंत, ज्येष्ठ पत्रकार पुण्यनगरी वृत्तपत्राचे दिलीप लोखंडे, सार्वमत वृत्तपत्राचे दीपक दातीर, रुद्रा न्यूज चे संपादक एन.डी.चोरमले, अखिल भारतीय मानवाधिकार मिशन अहमदनगर जिल्हाध्यक्ष धनंजय माने आदी पत्रकार उपस्थित होते.