आरोग्य व शिक्षण

शिर्डी. कृत्रिम बुद्धिमत्तेचा सदुपयोग विद्यार्थ्यांनी अभ्यासात करावा.

शिर्डी. कृत्रिम बुद्धिमत्तेचा सदुपयोग विद्यार्थ्यांनी अभ्यासात करावा.

शिर्डी. कृत्रिम बुद्धिमत्तेचा सदुपयोग विद्यार्थ्यांनी अभ्यासात करावा. श्रीमती छायाताई फिरोदिया प्रमुख कार्यवाह – अ. ए. सोसायटी,अहिल्यानगर शिर्डी सोमवार दिनांक 22 डिसेंबर रोजी अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या श्री साईनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे 69 वे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ अतिशय उत्साहात पार पडला .

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या प्रमुख कार्यवाह श्रीम.छायाताई फिरोदिया या उपस्थित होत्या.मोबाईलच्या आभासी दुनिया पासून दूर राहून ध्येय साध्य करण्यासाठी मेहनत घ्यावी, तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ए. आय चा.सदुपयोग विद्यार्थ्यांनी अभ्यासात करावा असे आवाहन केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय श्री धनेश स्वामी (प्रकल्प संचालक भारतीय राष्ट्रीय मार्ग प्राधिकरण अहिल्यानगर) हे होते .योग्य संस्कार व कठोर परिश्रम घेतल्यास कोणत्याही क्षेत्रात यश मिळते असे त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांनी स्वयंशिस्त ठेवून पालकांनी पालक सभांना उपस्थित रहावे असे आव्हान शाळा समितीचे  चेअरमन मनोज लोढा यांनी केले .

याप्रसंगी मा.श्रीम.सुनिता मुथा, मा.पुष्पा फिरोदिया ,आशाताई फिरोदिया- सदस्य सल्लागार मंडळ तसेच गौरव मिरीकर विश्वस्त – अ. ए सोसायटी व सर्व मान्यवर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले . प्रशालेचे प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील जवळपास 100 विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र ,रोख रक्कम, सन्मानचिन्ह व संस्थेकडून भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ रेखा आघाव, सौ घनकुटे, श्रीमती आमकर, श्री ठाकरे यांनी केले .

पारितोषिक यादी वाचन प्रा श्री संतोष गोर्डे व श्रीमती घोगरे यांनी केले शिक्षक प्रतिनिधी म्हणून श्री मनोहर लांगी व सौ हांडे यांची निवड करण्यात आली होती . उच्च माध्यमिक विभागाचे चिरंजीव आकाश गायकवाड व कुमारी साक्षी त्रिभुवन यांची आदर्श विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली होती. याप्रसंगी एन.सी.सी.विद्यार्थ्यांनी परेड सादर करून मानवंदना दिली. सदर कार्यक्रमासाठी प्राचार्य श्री अभिमन्यू डुबल ,उपमुख्याध्यापिका सौ वनिता बोराडे व पर्यवेक्षक शंकर बेलदार मुख्याध्यापिका प्र सौ आगलावे (प्राथमिक विभाग )यांचे मार्गदर्शन झाले.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री राजू कुसमुडे.श्री जाधव एन पी ,श्री संजय तमनर ,श्री पंडित, श्री कोबरणे , श्री शेख, सौ शेळके श्रीम.विटणकर, श्री किशोर दळवी, सौ कोळपकर ,श्री हातागळे श्री खटके श्री पिपाडा आदींनी परिश्रम घेतले .

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे