बाळासाहेब भोसले यांचा सेवानिवृत्तीनिमित्त गौरव समारंभ संपन्न

बाळासाहेब भोसले यांचा सेवानिवृत्तीनिमित्त गौरव समारंभ संपन्न
आळंदी देवाची (दि २२ जून) – श्री संत ज्ञानेश्वर महाराज विद्यालयात प्रयोगशाळा सहाय्यक शिक्षक म्हणून २१ वर्षे प्रामाणिक सेवा बजावलेल्या आयु. बाळासाहेब पोपट भोसले यांचा सेवानिवृत्तीनिमित्त तक्षशिला बुद्ध विहार, आळंदी देवाची येथे सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.
या वेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खेड तालुका) चे मा. अध्यक्ष आयु. विश्वनाथ थोरात व सामाजिक कार्यकर्ते श्री. बाप्पूसाहेब रायकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन भोसले यांचा सत्कार करण्यात आला.
आळंदीतील सुप्रसिद्ध शिल्पकार व रांगोळी कलेतील नावलौकिक लाभलेले आयु. बाळासाहेब भोसले हे केवळ शिक्षकच नव्हे, तर कला व सामाजिक क्षेत्रातही सक्रिय राहिले आहेत. त्यांच्या सेवेबद्दल आणि योगदानाबद्दल उपस्थित मान्यवरांनी कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमास आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते भिमराव थोरात, विलास रणपिसे,आनंद रणदिवे, सामाजिक कार्यकर्ते नामदेव सुरपल्लीकर,अशोक थोरात, नितीन कुऱ्हाडे, किसन मोजाड, विनायक गायकवाड, संजय रंधवे, सुभाष भोसले, बाळू(तात्या) भोसले,चारुदत्त रंधवे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाद्वारे एकात्मतेचा, सन्मानाचा आणि प्रेरणेचा संदेश देण्यात आला.



