
वांगी बुद्रुक उपसरपंच यांच्याविरुद्ध सहा सदस्यांचे अविश्वास ठराव नोटीस तहसीलदारांकडे दाखल.
श्रीरामपूर तालुक्यातील वांगी बुद्रुक ग्रामपंचायत विद्यमान सरपंच सौ प्रभावती ज्ञानेश्वर लकडे यांच्याविरुद्ध वांगी बुद्रुक तालुका श्रीरामपूर येथील ग्रामपंचायत मधील एकूण सहा सदस्यांनी 26 2 2026 रोजी अविश्वास ठराव नोटीस तहसीलदार यांच्याकडे सादर केली आहे. यामध्ये अविश्वासाचे उपसरपंच अधिकाराचा गैरवापर करतात, उपसरपंच म्हणून असणारे कर्तव्य पार पाडत नाही, उपसरपंच विश्वासात न घेता मनमानेल तसा कारभार करतात, शासकीय योजनांपासून गावाला वंचित ठेवतात, आदिवासी सदस्य व ग्रामस्थ यांच्यात मतभेद निर्माण करतात व विशेष म्हणजे उपसरपंच महिला असतानाही तिचे पती स्वतः कारभार पाहत असतात व पदाचा दुरुपयोग करतात. या कारणाने 06 सदस्य यांनी सह्या करून उपसरपंच यांच्यावर आमचा विश्वास राहिलेला नसल्याचे नोटीसी मध्ये म्हटले आहे.
सदर अविश्वास प्रस्तावात नमूद मुद्द्यावर चर्चा व मतदान करणे कामी, सर्व सदस्यांची विशेष सभा 2/3/ 2026 रोजी दुपारी 1 वाजता ग्रामपंचायत कार्यालय वांगी बुद्रुक येथे आयोजित करण्यात आलेली आहे. सध्या तरी हालचालींना वेग आला असून, सदस्यांचे मने वळवण्याचे काम चालू असल्याचे काही सदस्यांनी सांगितले आहे. पुढे काय होणार याकडे सर्व ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.



