पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांना डॉ विजय मकासरे यांच्यावर गुन्हा दाखल केल्यासंदर्भात शपथपत्र सादर करण्याचे आदेश..

श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन चे तत्कालीन पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांना डॉ विजय मकासरे यांच्यावर गुन्हा दाखल केल्यासंदर्भात शपथपत्र सादर करण्याचे आदेश..
जिल्हाभर गाजलेल्या श्रीरामपूर येथील तत्कालीन पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी डॉ विजय मकासरे यांच्यावर गु.र.क्रमांक 484/2019 ची फिर्याद भादवी कलम 353 व इतर कलमांतर्गत दाखल केली होती.
सदरची फिर्याद ही खोटी असल्यामुळे डॉ विजय मकासरे यांनी मा.उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अँड दत्तात्रय मरकड यांच्यामार्फत सदरची केस रद्द होणेकामी फिर्याद याचिका दाखल केली होती.सदर गुन्ह्यामध्ये गुन्हा खोटा असल्याबाबत अहमदनगर लाचलुचपत विभागाने पो.निरीक्षक शाम पोवरे यांच्या कडून सविस्तर अहवाल सादर केला आहे तसेच गुन्हा खोटा असलेबाबत गाडीतील सीसीटीव्ही फुटेज दिलेले आहे..
सदर अहवालावरून व दिलेल्या पुराव्यावरून सदरची फिर्याद ही पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी त्यांच्यावरील लाचलुचपत विभागाची कारवाई टाळण्यासाठी तसेच डॉ विजय मकासरे यांच्यावरील सूडबुद्धीने व वैयक्तिक द्वेषापोटी खोट्या स्वरूपाची असल्याचे मत मा.उच्च न्यायालयाने नोंदवले असून त्यानुसार सदर फिर्यादी मधील तपासी अधिकारी पो.नि.श्रीहरी बहिरट यांना मा.उच्च न्यायालयात दि.23 ऑगस्ट 2022 पर्यंत या गुन्ह्यासंदर्भातील शपथपत्र दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
तत्कालीन पो.निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्याविरोधात डॉ विजय मकासरे यांनी राज्यभर गुटखा तपासामध्ये झालेला गैरप्रकार व आर्थिक देवाणघेवाण झाली असल्याची शक्यता वर्तवत प तत्कालीन पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांच्याकडे तक्रार दाखल केली होती.त्या प्रकरणात त्रुटी आढळून आल्यामुळे बहिरट यांच्यावर कारवाई ही करण्यात आली होती..या प्रकरणात डॉ विजय मकासरे यांनी मोठ्या प्रमाणात पाठपुरावा केला म्हणून डॉ विजय मकासरे यांच्यावर हे गुन्हे दाखल केले असल्याचे मकासरे यांचे म्हणणे आहे.