कृषीकन्या मार्फत कोळगाव येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन
कृषीकन्या मार्फत कोळगाव येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन
कोळगाव ता. श्रीगोंदा येथे ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत साईकृपा कृषी महाविद्यालयातील विद्यार्थिनींतर्फे बीजप्रक्रिया प्रात्यक्षिकाचे संयोजन करण्यात आले. कृषिकन्या शितल गव्हाणे, प्रिया कुऱ्हाडे, वैष्णवी आव्हाड, वैष्णवी कायगुडे, प्राजक्ता लाभते, डोंगरे आकांक्षा, पल्लवी लोंढे, स्नेहल मंचरे विद्यार्थीनींने ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांना बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आली. त्यास शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी बीजप्रक्रिया आणि त्याविषयी माहिती देण्यात आली. बीजप्रक्रियाचे महत्त्व पटवून दिले. शेती उत्पादनात प्रामुख्याने पीक संरक्षण हे जितके महत्वाचे आहे, तितकीच बीजप्रक्रियाही महत्वाची असते, एकंदरीत पिकाच्या उत्पादनाचे गणित यावर अवलंबून असतात. रासायनिक व जैविक या दोन पद्धतीने आपण बीजप्रक्रिया करू शकतो हे ही शेतकऱ्यांना समजून सांगितले. परंतु आपल्याकडे पाहिजे तितक्या प्रमाणात अजूनही बीजप्रक्रिया केली जात नाही. परिणामी अल्प उत्पादनासारख्या गोष्टी घडतात हे समजावून सांगितले.
‘या कार्यक्रमासाठी साईकृपा कृषी महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. के. एच निंबाळकर, प्रा. आर. एस. गोंधळी, प्रा. व्ही. बी. पाटोळे, प्रा. एस. एस. बंडगर, प्रा. पी एस केदारे, प्रा. डी. व्ही सांळुंके यांचे मार्गदर्शन लाभले.