ब्रेकिंगमहाराष्ट्र
खळबळजनक – शेतात विद्युत तारेचा शाॅक लागुन शेतकऱ्याचा मृत्यू

शेतात विद्युत तारेचा शाॅक लागुन शेतकऱ्याचा मृत्यू
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील राजपिंपरी शिवारातील शेतात विद्युत तारेचा शाॅक लागुन शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे
शेतात ट्रॅक्टरद्वारे मशागतीची कामे सुरू असताना शेतातील विद्युत तार तुटून शाॅक लागल्याने ही घटना घडली असल्याची माहिती आहे.
संजय विठ्ठलराव बर्गे राहणार गेवराई असे मृत्यु झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
घटनेनंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गेवराई उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.