भारतीय संविधान हे सर्वश्रेष्ठ आहे.एखाद्या उमेदवाराला जातीवरून हिणवलं जात असेल तर….सागर बेग

भारतीय संविधान हे सर्वश्रेष्ठ आहे.एखाद्या उमेदवाराला जातीवरून हिणवलं जात असेल तर….सागर बेग
*श्रीरामपूर(प्रतिनिधी):- भारतीय संविधान हे सर्वश्रेष्ठ आहे संविधानाने दिलेल्या आरक्षणाची मागासवर्गीय आमदारांच्या उपस्थितीत व्यासपीठावरून खिल्ली उडवली जात असेल एखाद्या उमेदवाराला जातीवरून हिणवलं जात असेल तर आशा अपप्रवृत्ती या ठेचल्याच पाहिजेत अशा मारहाणीचे मी उघडपणे समर्थन करत असल्याचे राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांनी स्पष्ट केले आहे.*
प्रसिध्दी पत्रकात सागर बेग यांनी म्हंटले आहे की,विधानसभा निवडणुकीत मला कोणत्याही राजकीय पक्षाचा आधार नसतांना शांततेच्या मार्गाने मतदारांनी मला पन्नास हजार मते दिल्याने बिथरलेल्या स्थानिक गल्लाभरू पुढाऱ्यांनी मला सध्या कोणत्या ना कोणत्या घटनेत गुंतवण्याचा खटाटोप चालू आहे.नुकत्याच झालेल्या मारहान प्रकरणात पोलीस प्रशासनावर दबाव टाकून मला हकनाक गुंतवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे हे सगळे नियम बाह्य आणि बेकायदेशीर आहे.
बेग यांनी पुढे म्हंटले की,काही दिवसांपूर्वी आपण एक निवेदन प्रसिद्ध केले होते.त्या निवेदनात आगामी नगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून गुन्हेगारी स्वरूपाच्या घटनांमध्ये माझे नाव गोवले जाण्याची भीती मी व्यक्त केली होती. सदर मारहाणी प्रकरणात माझे नाव गोवले गेले हा त्याच बदनामी नाट्याचा पुढचा अंक असून या प्रकरणी आपले नाव विनाकारण गोवले असल्याचा आरोप या प्रकरणातील कथित आरोपी सागर बेग यांनी केला आहे.
निवेदनात त्यांनी पुढे म्हटले आहे की सदर गुन्ह्यात फोन कॉलवर माझा सहभाग दाखवला आहे. माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की गुन्ह्याशी संबंधित सर्व मोबाईल चे सी डी आर तपासावे आणि सत्य जनतेसमोर आणावे. परंतु या आरोपात तथ्य आढळले नाही तर संबंधितांवरही योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची हिम्मत दाखवावी.
“भिकरचोट लोकांना पन्नास हजार मतं पडतात, याची आपल्याला लाज वाटली पाहिजे आपण रिव्हॉल्वर दाखवू असं उपाध्ये आपल्या भाषणात म्हणाले हे कायदा पायदळी तुडवनारे आहे. परंतु या गोष्टीची लाज वाटून घेण्यापेक्षा आपण कुठे कमी पडलो हे आत्मपरीक्षण त्यांनी करावे असा सल्ला सागर बेग यांनी निवेदनात दिला आहे. सदर भाषणात अशोक उपाध्ये यांनी आपल्या जातीचा आणि बाप दादांचा अपमान जनक पद्धतीने उल्लेख केलां आहे त्या भाषणाची ही चौकशी करण्याची मागणी सागर बेग यांनी केली आहे.
विधानसभेच्या व्यासपीठावर बऱ्याच व्यक्तींनी मी वाल्याचा वाल्मिकी झालो असल्याचे आपल्या भाषणातून सांगितले. परंतु आपल्यावर खालच्या पातळीवर जाऊन कोणी टीका करीत असेल तर त्याचे योग्य पद्धतीने उत्तर निश्चित दिले जाईल.
आपल्याला पुन्हा वाल्या कोळी व्हायला कोणीही भाग पाडू नये असे आवाहनही त्यांनी निवेदनात केले आहे.
सदर घटना घडल्यानंतर श्रीरामपूरात बळजबरीने हातात दांडके घेऊन संक्रांत सणाचे सामान रस्त्यावर विकणाऱ्या गरीब विक्रेत्यांना धमकावून हुसकावण्यात येऊन बंद ठेवण्यात आला. ऐन सणासुदीच्या दिवशी हातावर पोट असणाऱ्या बऱ्याच दुकानदारांना आपला माल उचलून पळ काढावा लागला. ही दंडेलशाही नाही का ?
काहीही झाले तरी बंद न पाळणारा श्रीरामपूरच्या वॉर्ड नंबर दोन चा भाग काल उत्स्फूर्तपणे बंद होता या गोष्टींचाही विचार श्रीरामपुरातील सुजान जनतेने करावा. विधानसभा निवडणुकीपासून तालुक्यातील राजकीय चित्र झपाट्याने बदलले आहे. माझ्या नेतृत्वाखाली जर हिंदू संघटित झाला तर काहींची राजकीय दुकानदारीच संपुष्टात येईल अशी भीती काहींना वाटत असून त्यातूनच माझ्या बदनामीचे षडयंत्र रचले जात असल्याचा पुनरुच्चार सागरबेग यांनी आपल्या निवेदनात शेवटी केला आहे.