निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे सन 2022 यावर्षीचे पर्यावरण संमेलन शिर्डी येथे होणार
निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे सन 2022 यावर्षीचे पर्यावरण संमेलन शिर्डी येथे होणार
यावेळी शिर्डी येथील पर्यावरण संमेलनाचे स्थळाची माहिती घेऊन, पाहणी निसर्ग पर्यावरण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केली, या कामी शिर्डी संस्थांनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा. बानाईत मॅडम यांच्या कार्यालयीन सहायकांनी त्यांना सहकार्य केले. यावेळी बाभळेश्वर येथे निसर्ग व पर्यावरण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत अहमदनगर जिल्ह्यातील मंडळाच्या सदस्यांनी केले.
याप्रसंगी येथे अहमदनगर जिल्ह्यातील काही निवडी करण्यात आल्या यामध्ये निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या जिल्हा कार्यकारणी सदस्यपदी टाकळीभान येथील सामाजिक कार्यकर्ते श्री अर्जुन भाऊसाहेब राऊत यांना नियुक्तीपत्र देताना निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदुषण निवारक मंडळाचे अध्यक्ष मा. प्रमोददादा मोरे,कार्याध्यक्ष मा. काकडे सर, सचिव तथा कोकण विभाग प्रतिनिधी धीरज वाटेगावकर सर पर्यावरण मंडळाचे उपाध्यक्ष , प्रकाश केदारी सर, पर्यावरण मंडळाचे राज्य प्रमुख संघटक प्रा. अनिल लोखंडे सर, प्रसिद्धीप्रमुख पत्रकार विजय राव बोडखे सचिव सुभाष वाखारे सर आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. निसर्ग पर्यावरण मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा अहमदनगर जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या वतीने पत्रकार विजयराव बोडखे, प्रा.अनिल लोखंडे सर यांच्यावतीने यथोचित सत्कार यावेळी करण्यात आला.