टाकळीभान येथे न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयाने प्रत्येक विद्यार्थी एक झाड उपक्रम
टाकळीभान येथे न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयाने प्रत्येक विद्यार्थी एक झाड उपक्रम
विद्यार्थी वृक्षारोपण ही काळाची गरज असून प्रत्येकाने वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करावे असे प्रतिपादन रयत जनरल बॉडी सदस्य बापूसाहेब पटारे यांनी केले. न्यू इंग्लिश स्कूल व अण्णासाहेब पटारे पाटील जुनियर कॉलेजच्या वतीने अमृतमहोत्सवानिमित्त शासकीय नर्सरी च्या सहकार्याने विद्यालयाच्या अकराशे पन्नास विद्यार्थ्यांना वृक्ष रोपटे वाटपाचा कार्यक्रम पार पडला यावेळी ते बोलत होते. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की बेसुमार वृक्षतोडीमुळे विविध नैसर्गिक आपत्ती ओढवत असून मानव जातीचे आरोग्य धोक्यात येत आहे. यासाठी निसर्गाचे जतन करून झाडे लावून त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे. कोरोना काळामध्ये आपण यावेळी त्यांनी प्रत्येकाच्या वाढदिवसा दिनी, व दशक्रियाविधी नंतर आठवण म्हणून प्रत्येकाने एक झाड लावावे, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.यावेळी निसर्ग पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे जिल्हा कार्यकारणी सदस्य अर्जुन राऊत यांनी या स्तुत्य उपक्रमाचे अभिनंदन करून विद्यालयाचे आभार मानले.कार्यक्रम प्रसंगी वनरक्षक संदीप जाधव ,दिपक निर्वाण, स्थानिक स्कूल कमिटीचे जेष्ठ सदस्य मंजाबापू थोरात, कमिटीचे अध्यक्ष राहुल पटारे, उपसरपंच कान्हा खंडागळे, माजी उपसरपंच भारत भवार,प्रा.जयकर मगर, भाऊसाहेब पटारे, मोहन रणनवरे,भाऊ कोकणे, शिवाजीराव वखरे, भाऊ कोकणे, बाळासाहेब पटारे, सुभाष ब्राह्मणे, राजेंद्र कोबरणे, विक्रम मगर, , शासकीय नर्सरी चे बाळासाहेब कांबळे, पत्रकार बांधव, प्राचार्य बी. टी. इंगळे, आदींसह शिक्षक ,शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका प्रियंका चाबुकस्वार यांनी केले