आळंदीत राहतात त्यांची अजून नावे लागली नाही आणि रहिवासी नाही ते आळंदीच्या मतदार यादीत*

*आळंदी च्या प्रशासनाची गोंधळाची परिसीमा पंचक्रोशीतील मतदार आळंदीकर मतदारयादीत*
*आळंदीत राहतात त्यांची अजून नावे लागली नाही आणि रहिवासी नाही ते आळंदीच्या मतदार यादीत*
आळंदीच्या मतदार यादीत पंचक्रोशीतील लोकांची नावे समाविष्ट असल्याने या गलथान कारभारामुळे नागरिकांना धक्का बसला आहे. गेली कित्येक वर्ष आळंदी त राहतो पण काहीना काही अडचणी मुळे मतदार यादीत नाव नाही असे असताना माञ जे लोक आळंदी त रहात नाहीं त्यांची आळंदीत मतदार म्हणुन नावे पाहून नागरिकांना धक्का च बसला आहे. हा इतका गैर जबाबदार पणा होतो कसा याची माहिती घेत. आळंदी नगरपरिषद प्रशासनास सुचना देत जाब विचारण्या साठी हरकती घेतल्या आहेत. आळंदीतील राष्ट्रवादीचे युवा नेते रोहन कुऱ्हाडे यांनी माजी नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे . माजी नगरसेविकेचे पती मारूती कवितके.केतन कुऱ्हाडे. सौरभ गव्हाणे. सुदर्शन शिंदे. ओम गंगोत्री. संकेत पाटील. निखिल बनसोडे यांनी सह्यांचे निवेदन देत आक्षेप नोंदवला आहे. सुमारें दोन हजार हरकती आल्या असून हरकतीचे निवेदन आळंदी नगर परिषद कर्मचारी अर्जुन घोडे यांनी ते स्वीकारले आहे. माजी नगरसेवक दिनेश घुले यांनी विशेष हरकत घेतली आहे . प्रभाग क्र ९ मध्ये २५० बाहेर गावच्या लोकांची नावे मतदार म्हणुन नोंदवली आहेत. अशीच परिस्थिती सर्व आळंदी च्या वार्डात झाल्याचा त्यांचा आरोप आहे. मुळात स्थानिक जबाबदार व्यक्ती कार्यरत असुनही हा घोळ होतो याच आळंदीकर आश्चर्य व्यक्त करत आहेत. आळंदीच्या अंतर्गत प्रभागात हि हाच प्रकार झाल्याने निवडणुका पारदर्शक होणार यावर प्रश्न चिन्ह निर्माण झालाय. हरकती नोंदवल्या गेल्या खऱ्या पण त्याचा न्याय मिळण्या कामी उपयोग होणार की केराची टोपली भरणार याकडे भांबावलेल्या मतदारांचे लक्ष लागले आहे