ब्रेकिंगमहाराष्ट्र
श्रीमती देठे आर.ए.यांच्याकडून वसतिगृहास ब्लँकेट वाटप

श्रीमती देठे आर.ए.यांच्याकडून वसतिगृहास ब्लँकेट वाटप
टाकळीभान प्रतिनिधी- न्यू इंग्लिश स्कूल व अण्णासाहेब पटारे पाटील कनिष्ठ महाविद्यालय टाकळीभान येथे विद्यालयाच्या माजी ज्येष्ठ शिक्षिका हिंदी विषय तज्ञ श्रीमती देठे मॅडम व त्यांची कन्या रत्नमाला देठे यांनी विद्यालयाचे वस्तीगृह श्रीमती अहिल्यादेवी विद्यार्थी वसतिगृहात राहणाऱ्या इयत्ता पाचवी ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांना ब्लॅंकेट वाटून तर इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना टॉवेल्स वाटून वस्रदान केले.त्याचे वस्तीगृह अधिक्षक श्री. गलांडे एस.एल. यांनी स्विकार केले. त्याबद्दल विद्यालयाचे प्राचार्य श्री. इंगळे बी. टी.तसेच स्थानिक स्कूल कमिटी सदस्य आणि सर्व शिक्षकवृंद यांच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानले.