माता अनुसया यांच्या पतिव्रता धर्मशक्ति प्रभावाने ब्रह्म विष्णू महेश यांनी धारण केला श्री भगवान दत्तात्रेय अवतार*

**माता अनुसया यांच्या पतिव्रता धर्मशक्ति प्रभावाने ब्रह्म विष्णू महेश यांनी धारण केला श्री भगवान दत्तात्रेय अवतार*
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा भगवान श्री दत्त गुरु यांचा जन्म सृष्टीच्या रचनेतील खुप मोठी ऐतिहासिक पौराणिक घटना आहे . समुद्र मंथन होऊन जस विष अमृत निघालं तसं ब्रह्म विष्णू महेश यांच्या पत्नी यांना आपणच सगळ्यात सर्व श्रेष्ठ असल्याचा जो अंहाकार निर्माण झाला तो अंहकार नष्ट होण्यासाठी जे मंथन झाल आणि देवी माता अनुसया यांची सत्वपरीक्षा घेण्यासाठी आलेले दैव ब्रह्म विष्णू महेश माता अनुसया यांच्या आश्रात वेष भुषा बदलुन परिक्षा घेतात पण माता अनुसया आपले पती आञी ऋषी यांचा आव्हान करून परिक्षेला सामोरे जातात आणि विश्व नियंत्रक ब्रह्म विष्णू महेश सहा महिन्यांचे बालक होतात आणि माता अनुसया आपल पतिव्रताच अस्तित्व अबाधित ठेवून हि कठिण आणि अलौकिक परिक्षा उत्तीर्ण होतात . आणि शेवटी माता अनुसया यांच्या पतिव्रता धर्मा समोर अखेर ब्रह्म, विष्णू ,आणि महेश यांना माता अनुसया यांच्या वर प्रसन्न होऊन बालक रूपाने ञिदेव एकत्रित रित्या जगद्गुरु श्री दत्त रुपाने सृष्टी वर अवतार धारण करतील असा आशिर्वाद द्यावा लागला . आणि याच आशिर्वाद परिणाम स्वरूप भगवान श्री दत्तात्रय यांचा जन्म झाला . महान तपस्वी आञी ऋषी यांच्या धर्म पत्नी माता अनुसया ह्या सृष्टी वरील सगळ्यात महान पतीव्रता पण नेमकं हिच बाबा अखिल ब्रह्मांड नायक असणारे सृष्टी चे मुख्य पालनकर्त ब्रह्म, विष्णू आणि महेश यांच्या पत्नी देवी पार्वती, लक्ष्मी, आणि सरस्वती यांना आपल्या पेक्षा श्रेष्ठ सृष्टी वर अनुसया आहे हे ऐकल्यानंतर सहाजिकच त्यांचा अंहकार बळावल्याने त्यांना हे अनुसया यांच श्रेष्ठत्व रूचल आणि पचल पण नाही म्हणून देव पत्नी यांनी माता अनुसया यांच्या पतिव्रता धर्माचा भंग व्हावा आणि आपणच सर्व श्रेष्ठ पतिव्रता असावं म्हणून ब्रह्म विष्णू आणि महेश यांना विशेष मोहीमेवर पाठवलं आप आपल्या धर्म पत्नींच्या इच्छेनुसार सृष्टी वर आलेले सृष्टीचे पालनकर्त हे माता अनुसया यांच्या भक्ति आणि पतिव्रता धर्म समोर जिंकु शकले नाही . आणि शेवटी सती अनुसया यांच्या पतिव्रता धर्माचा विजय झाला आणि ब्रह्म विष्णू आणि महेश यांना अनुसया यांच्या शक्ति समोर बालकं व्हावं लागल आणि हि बाब देव पत्नी यांना अवगत झाल्यानंतर त्यांना माता अनुसया यांच्या कडे विनवणी करून पुन्हा आपल्या पतीची मुळ स्वरूपात परत मागणी केली . महान तपस्वी आञी ऋषी यांच्या पत्नी देवी अनुसया यांनी हि मागणी मान्य केल्यानंतर मग ब्रह्म विष्णू आणि महेश यांनी सृष्टी वर सुखदुःख मोहमाय या सगळ्या विवंचनेतून जीवाची मुक्ति व्हावी आणि आत्मा ते परमात्मा हा प्रवास सोपा व्हावा एकत्रिकरणाने माता अनुसया यांच्या पोटी जन्म घेण्याचा शब्द दिला गुरूचे गुरू नवनाथ संप्रदायाचे प्रमुख आधारस्तंभ गुरूदत्त यांचा जन्म मार्गशीर्ष पौर्णिमेच्या पावन पर्वावर प्रदोष काळात झाला आहे . म्हणून दत्त जयंती हि साधारणपणे दुपार नंतर साजरी केली जाते .दैवी शक्ती आणि लिला ह्या या सृष्टीवर नविन नाहीत वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळ्या पद्धतीने लोक कल्याण करण्यासाठी ईश्वर अवतार धारण करून लोक उपदेशाची परंपरा अंखडीत चालू आहे आणि याच आपण थोडं बारकाईने निरीक्षण केले तर वेळोवेळी आपणास प्रत्यय आल्याशिवाय रहाणार नाही.शेवटी ह्या सगळ्या बाबी ह्या धार्मिक आणि आस्थेशी निगडित असल्याने मान्य करणं किंवा न करणं हा प्रत्येकाच्या व्यक्तिगत श्रद्धेचा अवस्थेचा भाग आहे . धर्म हा आस्थेवर टिकुन असतो . आणि आस्था हि जबरदस्तीने नाही तर स्वयंप्रेरणेने निर्माण होत असते . मानवी शरीर हे क्षणभंगुर असल्याने हा आत्म्याचा प्रवास सुलभ व्हावा . जीवनातील बहु दुःख कधीतरी कमी व्हावेत आणि जीवाला आत्म मुक्तिच ज्ञान व्हाव म्हणून ब्रह्म विष्णू आणि महेश यांनी एकत्रितपणे दत्त अवतार धारण केला आणि याच मुख्य कारण ठरलं ते माता अनुसया यांच्या पतिव्रता धर्माचा विजय म्हणजे भक्ति ची शक्ति हि कधी पण श्रेष्ठ असतेच आणि याच भक्ति च्या शक्ति मुळं ब्रह्म विष्णू आणि महेश यांना माता अनुसया यांच्या पोटी श्री दत्त रूपाने जन्म घ्यावा लागला आणि हा जन्मोत्सव म्हणजेच दत्त जयंती त्या निमित्ताने आपण दर वर्षी ह्या शुभ मुहूर्तावर साजरी करतो आणि लाखोंच्या संख्येने असलेल्या भक्तांसाठी आणि विशेष करून नाथ संप्रदायासाठी हा एक विलक्षण क्षण योग आणि अनुभव असतो .