संपादक व पञकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य श्रीरामपूर तालुका अध्यक्ष लांडगे तर उपाध्यक्ष लोखंडे यांची निवड
संपादक व पञकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य श्रीरामपूर तालुका अध्यक्ष लांडगे तर उपाध्यक्ष लोखंडे यांची निवड
टाकळीभान प्रतिनिधी -राज्यात पञकारांच्या हीतासाठी काम करीत आसलेल्या राज्याचे अध्यक्ष किसनराव हासे व अहमदनगर जिल्हाध्यक्ष म्हणुन जिल्ह्यात प्रभावीपणे काम करीत आसलेल्या मनोजकुमार आगे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आसलेल्या संपादक व पञकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य मुंबईच्या श्रीरामपुर तालुका अध्यक्ष पदासाठी पत्रकार चंद्रकांत लांडगे यांची, उपाध्यक्ष पदासाठी ज्येष्ठ पत्रकार दिलीप लोखंडे यांची तर सचिव पदी दत्ताञय थोरात यांची बैठकित एकमताने निवड करण्यात आली.
अहमदनगर जिल्हाध्यक्ष मनोजकुमार आगे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच टाकळीभान येथे बैठक संपन्न झाली. या बैठकित पञकारांच्या अडीआडचणी बाबत सखोल चर्चा झाली. मार्गदर्शक तत्वानेच पञकारीता करण्याबाबतही बैठकित एकमत झाले. यावेळी जिल्हाध्यक्ष मनोजकुमार आगे मार्गदर्शन करताना म्हणाले कि, पञकारांनी सजग पञकारीत करण्याची वेळ आता आली आहे. त्यामुळे समाज हितासाठी पञकारीता करत आसल्याने सावधानता बाळगावी. पञकारांच्या सर्व प्रकारच्या आडचणीसाठी पञकार संघ ठामपणे उभा आसल्याने पञकारांचे संघटन अधिक मजबुत करण्यासाठी प्रयत्न करावेत असेही ते यावेळी म्हणाले.
या बैठकित श्रीरामपुर तालुक्याच्या नुतन कार्यकारीणीची निवड करण्यात आली. यावेळी तालुकाध्यक्ष पदी चंद्रकांत लांडगे, उपाध्यक्ष पदी दिलीप लोखंडे व हरीभाऊ बिडवे, सचिवपदी दत्ताञय थोरात तर संपर्कप्रमुख पदी रावसाहेब साठे यांची एकमताने निवड करण्यात आली. तर रामेश्वर आरगडे, अशोक रणनवरे, बापुसाहेब नवले, मोहन जगताप, विकास बोर्डे, संदीप बोडखे, अर्जुन राऊत, अनिता तडके यांची कार्यकारीणी सदस्य पदी निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष संदीप जगताप यांची जिल्हा कार्यकारीणीत वर्णी लावण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.