महाराष्ट्र
वकिल आढाव पती पत्नी बेपत्ता काही महिती असल्यास संर्पक करण्याचे पोलिसांचे आवाहन
वकिल आढाव पती पत्नी बेपत्ता काही महिती असल्यास संर्पक करण्याचे पोलिसांचे आवाहन
राहुरी येथील वकिल आढाव दांपत्य
गुरुवारी 25 जानेवारीपासून बेपत्ता झाले असून कुणाला माहिती असल्यास राहुरी पोलिसांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राहुरी तालुक्यातील मानोरी येथील रहिवासी असलेले एड. राजाराम आढाव आणि त्यांच्या पत्नी एड. मनीषा राजाराम आढाव हे राहुरी कोर्टात वकिली व्यवसाय करतात .
गुरुवार दिनांक 25 जानेवारी रोजी त्यांचे चार चाकी वाहन राहुरीत आढळून आल्यानंतर ते बेपत्ता झाल्याचे लक्षात आले.
राहुरी पोलीस ठाण्यामध्ये वकील आढाव दांपत्य बेपत्ता झाल्याची मिसिंग दाखल करण्याचे काम सुरू होते .
दरम्यान , याविषयी कोणाला माहिती असल्यास 84 59 53 33 26 या अथवा राहुरी पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आलेले आहे .