इथं घडतोय उद्याचा भारत….

इथं घडतोय उद्याचा भारत….
टाकळीभान प्रतिनिधी – स्वतःच्या प्रगतीत मग्न असणारा म्हणजे ‘भारत’… अशा आपल्या प्रिय भारत देशाच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त माझ्या गावातील सोनगाव-सात्रळ येथील आनंद गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये झेंडावंदन करण्याचे भाग्य मला लाभले. स्कूलचे अध्यक्ष डॉ.के.के. बोरा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ध्वजारोहण सोहळ्यात झेंडा फडकविल्यावर झेंड्यातून अंगावर फुलांचा वर्षाव झाला, तेव्हा समाजासाठी करत असलेल्या प्रबोधनाच्या कामाची जबाबदारी आणखी वाढल्याची जाणीव झाली. ध्वजारोहनानंतर विद्यार्थ्यांनी भाषणे, गीतातून देशभक्तीचा जागर सादर केले. तो माझ्यासह उपस्थितांच्या मनाला भावला. वेगवेगळ्या स्पर्धेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना गौरविताना त्यांच्यातील इनोसंटनेस मलाही ऊर्जा देऊन गेला.भाषणाची वेळ आली तेव्हा मी विद्यार्थ्यांना एकच सांगितलं…देशाचं उद्याचं भविष्य तुम्ही आहात.. तुम्ही घडला.. तर देश घडेल… त्यासाठी रोज स्वतःला सांगा… शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही…. कडाक्याच्या थंडीतही दहा मिनिटांच्या भाषणाला विद्यार्थ्यांनी मन लावून ऐकले… आवडले तिथे उत्स्फूर्त दादही दिली… पत्रकारितेत काम करत असताना रोज समाजाची नकारात्मकता जेव्हा समोर येते तेव्हा आपसूक मनात प्रश्न निर्माण होतो… काय होणार उद्या या देशाचं?
आज आनंद गुरुकुल मधील झेंडावंदन करताना देशभक्तीने भारावलेले वातावरण… विद्यार्थी घडविण्यासाठी तत्पर असलेले शिक्षक….सकारात्मकतेचा सर्व्हर असणारे विद्यार्थी पाहिले… तेव्हा माझ्या प्रश्नाचे उत्तर मला मिळाले…. इथेच घडतोय उद्याचा भारत… झेंडावंदनासारखं पवित्र कार्य करण्यासाठी मला बोलावल्याबद्दल थँक्स आनंद गुरुकुल टीम,प्रिन्सिपल अर्चना प्रधान, डॉ.के.के.बोरा, डॉ.राहुल बोरा,सतीशभाऊ गांधी,डॉ.लीलावती बोरा, डॉ.अर्चना बोरा,मीरा लोढा. उपस्थित होते,