जल जीवन मिशन योजना प्रभावीपणे राबवली जाईल.

जल जीवन मिशन योजना प्रभावीपणे राबवली जाईल.
टाकळीभान प्रतिनिधी – जल जीवन मिशन योजना प्रभावीपणे राबवली जाईल. एक घर तेथे एक नळ शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जाईल. असे ग्रामसभेत उपसरपंच कान्हा खंडागळे यांनी सांगितले.याग्रामसभेच्या अध्यक्ष सरपंच सौ, अर्चनाताई रणनवरे या होत्या.
यावेळी बोलताना कान्हा खंडागळे म्हणाले की जल जीवन मिशन योजनेसाठी १ कोटी ९० लाख रुपये मंजूर असून पुढील भविष्याच्या 30 वर्षाच्या पिण्याच्या पाण्याच्या नियोजनासाठी वाढीव निधीची गरज असून त्या संदर्भात प्रस्ताव ग्रामपंचायत वरील पातळीवर पाठविला आहे. महादेव मंदिर मागील गाव तळ्यामध्ये जल जीवन मिशन योजना राबविणार असून बंदिस्त पाईपलाईन द्वारे त्यामध्ये भंडारदराच्या कॅनल येथून पाणी पडणार आहे. योजनेस मोठा मेंटेनन्स असून 70 हॉर्स पॉवरच्या मोटरी लागणार आहेत. त्यास २५ लाख रुपये खर्च असून दरवर्षीचा मेंटेनन्स १० ते १२ लाखाचा आहे. तरी आपण या योजनेसाठी विजेची बचत व्हावी व खर्च कमी यावा यासाठी सौर पॅनल बसवणार बसून त्यामुळे खर्चात बचत होणार आहे.
तसेच या योजनेद्वारे घर तेथे नळ जोडून गावास शुद्ध पाणीपुरवठा करण्याचा मानस आहे. घरकुल प्रश्नांसंदर्भात खाजगी जागेची अट असून, शासन फेब्रुवारी एंडिंग नंतर यामधे लक्ष घालणार असून तोही प्रश्न मिटणार आहे. बस स्टँड प्रश्नसंदर्भात आ. लहू कानडे यांच्याशी व गावातील पदाधिकारी व ग्रामस्थ यांच्याशी चर्चा करून तो प्रश्न सोडवण्यात येईल.
तसेच गावासाठी आ. डॉ. सत्यजित तांबे यांच्या निधीतून सुसज्ज ग्रंथालयसाठी ४० लक्ष रुपये निधी मंजूर होत असून हे गावाच्या मध्यभागी मुला मुलींच्या सोयीनुक्त अशा ठिकाणी करण्यात येईल. गावामधील अंगणवाड्यांना स्टेप बाय स्टेप तार कंपाउंड करण्यात येणार असून त्यांच्या जागा संरक्षित करण्यात येतील. स्टँड परिसर व आवश्यक त्या ठिकाणी रेडिमेड मुताऱ्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे.
यावेळी शिवाजीराव शिंदे यांनीही जल जीवन मिशन योजना प्रभावीपणे राबवून त्यासाठी वाढीव निधीची मागणी ग्रामपंचायत मार्फत करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी सुप्रिया धुमाळ यांनी पुनश्च बस स्टँड चा प्रश्न उपस्थित करून त्वरित बांधण्याची मागणी केली तसेच गावामध्ये दारूबंदी करण्याचा ठराव, व समाजहिताची चांगली कामे करणाऱ्याच्या विरोधात, अब्रू जाईल आशा खोट्या तक्रारी केल्या जातात.
सौ,मंगलताई कोकणे, यांनी गावात पत्रकार भवन व्हावे, व जे मुलं वृद्ध आई-वडिलांना सांभाळीत नाही, अशांना ग्रामपंचायत ने शासनाच्या कोणत्या योजनेचा लाभ देऊ नये ,असे मागणी केली,
यावेळी नारायण काळे यांनी शासनाच्या विविध योजनांचे लाभ घेण्याची ग्रामस्थांना आव्हान केले तसेच मुकुंद हापसे यांनी पंतप्रधान घरकुल योजना, अन्नसुरक्षा योजना त्यासंदर्भातील प्रश्न सोडवण्याचे आवाहन केले. तसेच पाझर तलाव व बंधाऱ्यांची कामेही निकृष्ट झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या मागणीला दुजारात देत त्याची चौकशी करण्याचे कान्हा खंडागळे म्हणाले.राजेंद्र रणनवरे यांनी पन्नास फूट बस स्टॅन्ड होऊन त्या ठिकाणी मुतारी व शौचालय याची मागणी केली.
यावेळी अर्जुन राऊत, काकासाहेब कोकणे, सुप्रिया धुमाळ, मंगलताई देवीदास कोकणे,अण्णासाहेब दाभाडे, बापूसाहेब नवले, दिलीप गोलवड, खरात मिस्तरी, राजेंद्र रणनवरे, यांनी सूचना मांडल्या. यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी कोकणे ,महावितरणचे घोळवे , प्राथमिक आरोग्य केंद्राचे राम बोरुडे यांनी आपल्या खात्यासंदर्भात माहिती दिली ग्रामसभे अगोदर महिला ग्रामसभा पार पडली यामध्ये महिलांनी गाव संदर्भात प्रश्न मांडले.
यावेळी अशोकचे माजी चेअरमन ज्ञानदेव साळुंके, दत्तात्रय नाईक , युवक नेते भाऊसाहेब पवार,अशोकचे संचालक यशवंत रणनवरे, राजेंद्र कोकणे ,राहुल पटारे, भाऊसाहेब पवार,प्रा. जयकर मगर, सुनील बोडखे, भाऊसाहेब पटारे, पाराजी पटारे, ऍड. धनराज कोकणे ,भैय्या पठाण, सुधीर मगर, श्रीकृष्ण वेताळ, अनिल बोडखे, देविदास कोकणे, प्रकाश धुमाळ,बाबासाहेब बनकर, महेंद्र संत, गणेश नागले, संजय पवार, ऋषीराज हापसे,रवी गाढे, आदी सह ग्रामस्थ उपस्थित होते.