आयुष्यमान भारत योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आव्हान लोकनियुक्त सरपंच हाजी अब्बास भाई शेख दयावान यांनी केले
आयुष्यमान भारत योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आव्हान लोकनियुक्त सरपंच हाजी अब्बास भाई शेख दयावान यांनी केले
मानोरी ग्रामपंचायत कार्यालयमधे आयुष्मान भारत योजने अंतर्गत लाभरत्यना कार्ड तयार करुण देण्यासाठी रविवार दिनांक=7-8-2022रोजी सकाळी ठीक10.00वाजता लोक नियुक्त सरपंच हाजी अब्बास भाई शेख दयावान यांच्या हस्ते उद्घाटन सम्पन झाले.यावेळी उपस्थित माजी सैनिक बाळासाहेब शिंदे प्रगतशील शेतकरी विठ्ठल हापसे तंटा मुक्तीचे सचिव पिरखा भाई पठाण बप्पूसाहेब यादवराव पाटील आढाव जितेंद्र तनपुरे अमोल म्हसे कौस्तुभ आढाव रवी भाऊ देठे बंटी आढाव जमाल पठाण हे उपस्थित होते
मानोरी गाव मध्ये 2011च्या जनगणनेनुसार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून या यादी मध्ये सुमारे 2800 नागरिकांच्या नावाची नोंद आहे या सर्व नागरिकांना आयुष्यमान भारत योजने अंतर्गत मोफत कार्ड देण्यात येणार असून या कार्ड चा पाच लाख पर्यंत मोफत उपचार मिळणार आहे या साठी नगर येथील चौदा नामांकित हॉस्पिटलचा समावेश आहे असे नगर येथील अधिकारी शुभम जाधव कांचन ताई नारळे व फैजाण सय्यद यांच्या कडून सांगण्यात आले या आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी बघायला मिळाली