पाच दिवसानंतर कामगारांच्या प्रश्नाबाबत तोडगा काढण्यात यश आंदोलन मागे -काँ सुरुडे
पाच दिवसानंतर कामगारांच्या प्रश्नाबाबत तोडगा काढण्यात यश आंदोलन मागे -काँ सुरुडे
बेलापुर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पगारवाढ करण्यात यावी प्राँव्हीडंट फंडाची रक्कम त्वरीत अदा करण्यात यावी या मागणीसाठी बेलापुर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी गेल्या पाच दिवसापासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु केले होते अखेर प्रशासन ग्रामस्थ व कामगार संघटना यांच्यात तडजोड होवुन कामगारांना रुपये नऊशे तसेच महागाई भत्ता दोनशे रुपये वेतनवाढ देण्याचा एकमताने निर्णय झाला त्यामुळे कामगारांनी आपले आंदोलन मागे घेतले वेतनवाढ करण्यात यावी पंधरा महीन्यापासुन थकीत असलेली प्राँव्हीडंट फंडाची रक्कम तातडीने जमा करावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य श्रमीक संघाचे काँ.जिवन सुरुडे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन सुरु केलेले आहे .आंदोलनाचा आज पाचवा दिवस होता .कामगार व ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्यात तोडगा काढण्यासाठी गटविकास अधिकारी अनंत परदेशी हे ग्रामपंचायत कार्यालयात आले होते ते येण्यापुर्वी जि प सदस्य शदर नवले सुनिल मुथा देविदास देसाई प्रफुल्ल डावरे गांवकरीचे चेअरमन साहेबराव वाबळे मोहसीन सय्यद मुस्ताक शेख यांनी सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे ग्रामविकास अधिकारी राजेश तगरे व कामगारांचे नेते जिवन सुरुडे यांच्याशी चर्चा करुन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी ८००रुपये व २००रुपये अशी एक हजार रुपये पगारवाढ देण्याचे कबुल केले मात्र कामगार हे १२००रुपये पगारवाढ करण्यावर ठाम राहीले त्यामुळे बैठकीत एकमत होवु शकले नाही कामगारांच्या मागण्याबाबत ग्रामपंचायत प्रशासन नागरिक कर्मचारी व कामगार नेते जिवन सुरुडे यांच्यात अनेक बैठका झाल्या .आज अखेर या बैठकीत तोडगा काढण्यात ग्रामस्थ प्रशासन व महाराष्ट्र राज्य श्रमीक संघ यांना यश आले .पाच दिवसापासून कामगार आपल्या मागण्यावर ठाम होते महागाई वाढली त्यामुळे पगार वाढ करण्यात यावी अशी मागणी कामगारांनी केली होती तर ग्रामपंचायतीचा वसुल कमी असल्यामुळे इतकी पगारवाढ देता येत नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे होते विरोधी पक्षनेते माजी सरपंच भरत साळूंके जनता अघाडीचे अध्यक्ष रविंद्र खटोड बेलापुर सेवा संस्थेचे चेअरमन सुधीर नवले यांनीही कामगारांच्या मागण्यावर योग्य तो तोडगा काढावा अशी सुचना केली होती आमदार लहु कानडे ,अशोक उद्योग समुहाचे सर्वेसर्वा भानुदास मुरकुटे गटविकास अधिकारी अनंत परदेशी यांनी आंदोलन स्थळी भेट देवुन कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या.सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे गांवकरी मंडळाचे नेते सुनिल मुथा गांवकरी पतसंस्थेचे चेअरमन साहेबराव वाबळे पत्रकार देविदास देसाई,ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत नवले, मुस्ताक शेख,भाजपाचे प्रफुल्ल डावरे,तेली महासंघाचे जिल्हाध्यक्ष लहानु नागले,पुरुषोत्तम भराटे,हाजी इस्माईल शेख,मोहसीन सय्यद,बाळासाहेब दाणी,अमोल गाडे,भैय्या शेख, सचिन वाघ,दिलीप दायमा,किशोर कदम, शफिक बागवान,रत्नेश गुलदगड, जिना शेख,रामदास वाबळे,दादासाहेब कुताळ, महेश कुऱ्हे,विशाल आंबेकर तसेच श्रीकृष्ण बडाख मदीना शेख शरद संसारे राजेंद्र मुसमाडे प्रकाश भांड आदिंनी तोडगा काढण्यासाठी विशेष प्रयत्न केले अखेर ग्रामपंचायतीच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करुन ग्रामस्थासमोर गावाकरीता दोन पावले मागे घेत आंदोलन स्थगीत करत असल्याचे कामगारांनी सांगितले या वेळी सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे कामगार नेते जिवन सुरुडे देविदास देसाई सुनिल मुथा प्रफुल्ल डावरे सेवा संस्थेचे चेअरमन सुधीर नवले आदिंनी मनोगत व्याक्त केले प्रफुल्ल डावरे यांच्या भाषणाचा धागा पकडून सुधीर नवले यांनी राजकारणाचा उल्लेख करताच उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी आक्षेप नोंदवला यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला भरत साळूंके यांनीही आक्रमक पावित्रा घेतला अखेर ग्रामस्थांच्या मध्यस्थीनंतर वादावर पडदा पडला.